निष्पक्ष निवडणुकीसाठी खाडे यांनी अठरा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या रोखल्या..

0

बीड ( प्रतिनिधी )

सध्या आसाम राज्यामध्ये भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. दरम्यान आचार संहिता लागली असताना तिथल्या सरकारने अठरा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. या सर्व बदल्या आसामचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी नितीन खाडे यांनी रोखल्या आहेत. संपूर्ण आसाम राज्यात निवडणुकीचे धोरण आणि भूमिका पार पाडणारे निवडणूक आयुक्त नितीन खाडे हे काही वर्षांपूर्वी बीड जिल्हा परिषदेचे "मुख्य कार्यकारी अधिकारी" म्हणून कार्यरत होते.

आता ते आसाम सरकारमध्ये काम पाहत आहेत. त्यांनी तेथे गृहसचिव म्हणून देखील काम पाहिलेले आहे. निवडणुका पारदर्शक व्हाव्यात, या उद्देशाने ते कार्यरत असून बीड जिल्ह्यात काम करणारा एक अधिकारी सध्या आसाम निवडणुकांसाठी पूर्ण राज्य सांभाळत आहे, हे विशेष.

आसाम सरकारने निवडणुका घोषित झाल्यानंतर बारा आयपीएस आणि नऊ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. या सर्व बदल्या खाडे यांनी निवडणूक काळापुरते रोखल्या आहेत. यामुळे निवडणूक आयोग पारदर्शकतेने काम करत आहे, हे स्पष्ट होत आहे. दरम्यान, मतदार जागृती अभियान देखील राबविणे त्यांनी चालू केले आहे.

" संकल्प हमारा टुटे न, कोई मतदान छुटे न " हा नारा त्यांनी आसामच्या मतदारांसाठी साठी दिला आहे. बीड जिल्ह्याने अनुभवलेल्या एक अधिकारी आसाम मध्ये अशा प्रकारचे काम करत आहे. हे दाखविण्याचा हा प्रयत्न असून चांगल्या कामाचे कौतुक करणे आवश्यक आहे, असे जन आंदोलनाची विश्वस्त अँड. अजित देशमुख यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here