खेड पोलीस स्टेशनच्या वतीने उत्कृष्ट पोलीस पाटलांचा करोना योध्दा म्हणून सन्मान

राजगुरूनगर :

खेड पोलीस स्टेशनच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. तसेच खेड हद्दीतील पोलीस पाटलांनी कोरोनाच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कर्तव्यदक्ष कामगिरी बजावल्याबद्दल पोलीस पाटलांना पुणे ग्रामीण चे पोलीस आधिक्षक अभिनव देशमुख यांच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करून प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

यावेळी पुणे ग्रामीण चे डी. वाय. एस. पी. अनिल लंभाते, खेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सतीश गुरव, पोलीस पाटील संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, पुणे जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या महिला अध्यक्षा तृप्ती मांडेकर यांच्या हस्ते उत्कृष्ट पोलीस पोलीस पाटलांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले, दावडीचे आदर्श पोलीस पाटील आत्माराम डुंबरे पाटील यांच्या कामाची दखल घेत पोलीस स्टेशनच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी खेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलीस पाटलांनी करोना काळातील केलेले काम जनजागृती, मास्क वाटप, भाजीपाला वाटप, करोना काळात प्रशासकीय अधिकाऱ्यांना केलेली मदत व या कठिण काळात जीवावर उदार होत पोलीस पाटलांनी केलेल्या कामाची दखल घेत पुणे ग्रामीण चे अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पोलीस पाटलांना करोना योध्दा म्हणून सन्मानित केले.

यावेळी उपस्थित खेड पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष अशोक चौधरी पाटील, उपाध्यक्ष आत्माराम डुंबरे पाटील, कार्यध्यक्ष निलेश दौंडकर, पोलीस पाटील किरण कोहीनकर, पप्पूकाका राक्षे, प्रमोद मांजरे, संदीप भागडे, संतोष होले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here