जातेगावला मायडीया कॅरियर कंपनी स्नेहालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर

सुपा :

पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतील मायडीया करियर या कंपनीने आपल्या सी एस आर डी फंडातून कंपनीच्या लगतच्या गावातील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन केले आहे.आज जातेगावमध्ये येथील श्री.काळ भैरवनाथ देवस्थान येथे समुदाय आरोग्यवर्धनी उपक्रमाअंतर्गत मोफत आरोग्य शिबिर घेतली.

यामध्ये आरोग्य तपासणी प्राथमिक औषधे वैद्यकीय सल्ला व प्राथमिक वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या. यात रक्त तपासणी व शरीराच्या विविध तपासण्या करण्यात आल्या शिबीराचा विविध प्रकारे 135 पेक्षा जास्त रुग्णांनी लाभ घेतला

 

यावेळी मायडिया कंपनीचे अधिकारी व स्नेहालय संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्री. सचिन ढोरमले जातेगाव चे सरपंच श्री.संजय गायकवाड उपसरपंच पतिराज श्री सोमनाथ ढोरमले.देवस्थानचे माजी अध्यक्ष विठ्ठल पोटघन. काळभैरवनाथ देवस्थानचे अध्यक्ष श्री.अर्जुन बढे उपाध्यक्ष श्री विजय जऱ्हाड सचिव प्रभु गायकवाड उपसमितीचे अध्यक्ष पत्रकार श्री.विशाल फटांगडे आदी उपस्थित होते. शिबीराच्या समारोप प्रसगी देवस्थानच्या वतीने सर्व स्टाफ चा सत्कार करण्यात आला.

2 COMMENTS

  1. Good ?V I should certainly pronounce, impressed with your site. I had no trouble navigating through all the tabs and related information ended up being truly easy to do to access. I recently found what I hoped for before you know it at all. Reasonably unusual. Is likely to appreciate it for those who add forums or something, website theme . a tones way for your client to communicate. Excellent task..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here