दूषित पाण्यामुळे प्रवरा नदीपात्रातील हजारो मासे मृत्युमुखी

आंबी
संदिप पाळंदे
आंबी – राहुरी तालुक्यातील आंबी-अंमळनेर हद्दीतील नदीपात्रात मळीसदृश्य विषारी पाण्यामुळे हजारो मासे मृत झाली असून मृत माशांचा तवंग नदीकाठी साचला आहे.
        प्रवरा नदीपात्रात मोठ्या प्रवणात पाण्याची आवक वाढली आहे. पात्रात आलेले पाणी मोठ्या प्रमाणात दुषित असून त्यामध्ये मळीसदृश्य पदार्थ विषारी पदार्थ मिसळला गेल्याची दाट शक्यता वाटते आहे. त्यामुळे पाण्यातील हजारो मासे मृत्युमुखी पडले असुन त्याची दुर्गंधी पसरायला सुरुवात झाली आहे. एकीकडे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न व जनजागृती केली जात आहे. दुसरीकडे विषारी व मळीमिश्रीत पाणी नदीपात्रात सोडून शासनाच्या प्रयत्नांना वाटाण्याच्या अक्षदा दिल्या जात असल्याचे चित्र सध्या प्रवरा पट्ट्यात दिसत आहे.
       काही दिवसांपूर्वी असाच प्रकार प्रवरा नदीवरील गंगापूर बंधाऱ्यात झाला होता. तेथेही विषारी पाण्यामुळे हजारो मासे मृत पावले होते. गंगापूरचे लोकनियुक्त सरपंच सतिष खांडके यांनी हा मुद्दा लावून धरत प्रशासनाला धारेवर धरले होते. तसाच प्रकार पुन्हा आंबी-अंमळनेर भागात निदर्शनास आल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरणात पसरले आहे.
        संबंधित प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष घालून परिसरात रोगराई वाढणार नाही याची दक्षता घेण्याची मागणी तालुक्याचे जेष्ठ नेते माजी सरपंच सतिष जाधव, आंबीचे सरपंच बाळासाहेब साळुंके, उपसरपंच विजय डुकरे, अंमळनेरचे सरपंच भारत जाधव, उपसरपंच किरण कोळसे, माजी सरपंच अशोक साळुंके, रोहण जाधव, सोसायटीचे चेअरमन विष्णू जाधव, बाळासाहेब पाटील, जालिंदर रोडे, नवनाथ कोळसे, भिम कोळसे, ऋषी जाधव, काका डुकरे, सुधाकर सालबंदे, प्रमोद जाधव, तुकाराम साळुंके, नितीन कोळसे, राजीव साळुंके, भागवत कोळसे, पत्रकार विश्वनाथ जाधव, संदिप पाळंदे आदी ग्रामस्थांनी केली आहे.

5 COMMENTS

  1. Just desire to say your article is as astounding. The clearness in your post is just spectacular and i could assume you are an expert on this subject. Well with your permission allow me to grab your RSS feed to keep up to date with forthcoming post. Thanks a million and please continue the rewarding work.

  2. Can I simply say what a aid to seek out someone who actually knows what theyre talking about on the internet. You undoubtedly know the right way to deliver an issue to mild and make it important. More individuals must learn this and perceive this facet of the story. I cant believe youre not more fashionable since you definitely have the gift.

  3. Hey there just wanted to give you a quick heads up and let you know a few of the images aren’t loading correctly. I’m not sure why but I think its a linking issue. I’ve tried it in two different browsers and both show the same results.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here