खासगी कार्यालये, आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवा – राज्य सरकारचा आदेश

मुंबई : 
राज्य शासनाने कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये (आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत.
 सामाजिक अंतर राखणे सोईस्कर होण्याकरिता उत्पादन क्षेत्रास पाळ्यांमध्ये (शिफ्टमध्ये) वाढ करण्याची मुभा स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने घेता येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे असेही या आदेशात म्हटले आहे.
 नाट्यगृहे व सभागृहे यामधील उपस्थिती देखील ५० टक्के असावी. तसेच त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

7 COMMENTS

  1. This is really fascinating, You’re a very professional blogger. I’ve joined your rss feed and sit up for in the hunt for more of your excellent post. Additionally, I’ve shared your site in my social networks!

  2. I like this post, enjoyed this one appreciate it for posting. “Good communication is as stimulating as black coffee and just as hard to sleep after.” by Anne Morrow Lindbergh.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here