बारामतीतील सर्व हॉटेल, ढाब्यांवर निर्बंध


५० टक्के क्षमतेनेच चालणार: प्रशासनाने केल्या सूचना जारी..


बारामती : सुरज देवकाते


बारामती मध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढू लागली आहे. (दि:२२) रोजी बारामतीत एका दिवसात कोरोना ८९ रुग्ण आढळले आहेत. गेल्या चार पाच दिवसांमध्ये कोरोनाच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता आता बारामती नगरपालिकेने उपाययोजना आखण्यास प्रारंभ केला आहे.आजपासून बारामतीतील सर्व हॉटेल, ढाब्यांवर निर्बंध लागू केले आहे.

कोव्हिड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगानेबारामती नगर परिषद चे मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी गुरुवारचा आठवडे बाजार पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते. आता त्यांनी  शहरातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, लॉज, बार, फुड कोर्ट, रसवंतीगृह, आईस्क्रिम पार्लर व खाद्य पदार्थ सेवनाची तत्सम दुकाने इ. आस्थापना त्यांच्या आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने (रात्री १०.०० वा.) पर्यंत सुरू राहतील. तसेच संबधित आस्थापनामधून पार्सल सेवा/घरपोच सेवा (रात्री ११.०० ) पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.


 संबंधित आस्थापना कडून सॅनिटायझर ठेवण्यात यावे, “नो मास्क नो एन्ट्री”  बोर्ड लावण्यात यावा, संबंधित आस्थापनाचे मालक/चालक व त्यामधील सर्व कर्मचारी यांनी कायमस्वरूपी मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर तसेच नियमांचे पालन करण्यात यावे, ग्राहक नोंदी साठी स्वतंत्र नोंदवही ठेवून ग्राहकांचे नाव व मोबाईल क्रमांक व स्वाक्षरी घेण्यात यावी.

प्रवेशद्वाराजवळ ऑक्सीमीटर, थर्मल स्कॅनिंग गन चा वापर करावा आणि लक्षणे आढळून न येणारे ग्राहक यांनाच प्रवेश देण्यात यावा. संपूर्ण आस्थापनामध्ये वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे तसेच स्वच्छतागृहात हात धुण्यासाठी साबणाची व्यवस्था करावी. असे आदेश जारी करण्यात आले आहे. वरील नियमांचे जो कोणी पालन करणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हणले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here