रांगोळी व चित्रकलेतून बालचिमुकल्यांनी दिला पर्यावरण व जलसंवर्धनाचा संदेश

3

जागतिक जलदिनाच्या निमित्ताने रांगोळी व चित्रकलेतून बालचिमुकल्यांनी दिला पर्यावरण व जलसंवर्धनाचा संदेश
प्रवरासंगम जिल्हा परिषदेच्या शाळेच्या वतीने अभिनव उपक्रम

नेवासा : (प्रतिनिधी)

जागतिक जलदिनाच्या निमित्ताने रांगोळी व चित्रकलेतून बालचिमुकल्यांनी पर्यावरण व जलसंवर्धनाचा संदेश देऊन कोरोनाच्या महामारीत ही घरबसल्या कलाकृतीद्वारे समाजात जनजागृती केली
नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका शीतल झरेकर-आठरे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.


प्रवरासंगम जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. मुख्याध्यापक राजेंद्र चापे यांच्या मार्गदर्शनाखाली व आदर्श शिक्षिका शीतल झरेकर-आठरे यांच्या पुढाकाराने या स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धेमध्ये इयत्ता चौथीतील विद्यार्थी कु. प्रिया सुडके,कु.श्रावणी मते,साई डावखर, कु.स्वानंदी ठाणगे,कु.प्रज्ञा पांडव,कु.गौरी पांडव,फरहान पिंजारी,कु.आदिती आगळे,कु.तनुजा कोठारी,कु.प्रिया सुडके,सहर्ष चव्हाण यांनी सहभाग नोंदवला.


जागतिक जलदिनाच्या निमित्ताने झालेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी चित्रासह रांगोळीद्वारे वसुंधरा देई..आरोग्य पाणी..करा तिची निगराणी,पशु व प्राण्यांना द्या चारा पाणी..टळेल वसुंधरेची हानी,जंगले वने सुरक्षित ठेवा,धरतीचा विनाश हटवा असा संदेश दिला.
या अभिनव उपक्रमाच्या मार्गदर्शक आदर्श शिक्षिका शीतल झरेकर-आठरे यांनी राबवलेल्या या जनजागृती अभियानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

3 COMMENTS

  1. Good day! I know this is kind of off topic but I was wondering if you knew where
    I could locate a captcha plugin for my comment form?
    I’m using the same blog platform as yours and I’m having difficulty finding
    one? Thanks a lot!

    Visit my page :: delta 8 carts

  2. Hi, Neat post. There is a problem along with your site in internet explorer, could test thisK IE nonetheless is the market chief and a huge section of other folks will miss your great writing due to this problem.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here