आज पासून बारामतीतील सर्व दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणार

0


अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चालू.


बारामती : सुरज देवकाते


बारामतीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढती कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार बारामतीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने आज पासून सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर उपहारगृहातील पार्सल सेवा मात्र सायंकाळी ७ ते रात्री १० पर्यंत चालू राहणार आहे.

बारामतीत मागील पाच दिवसांमध्ये तब्बल पाचशे कोरोनाग्रस्त आढळून आल्याने चिंता वाढली होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून बैठक आयोजित करण्यात आली होती दरम्यान या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 
या बैठकीत प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, मुख्याधिकारी किरण राज यादव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गटनेते सचिन सातव, वैद्यकीय अधीक्षक सदानंद काळे व शहरातील व्यापारी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये वाढलेला कोरोना नियंत्रित करण्यासाठीच्या उपाययोजना यावर चर्चा झाली. यामध्ये बाजारपेठेतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here