ग्रामीण भागातील खेळाडूंचे भवितव्य घडविण्यासाठी जिल्हा असोसिएशनने पुढाकार घेणे गरजेचे-कबड्डीपटू
राम आढागळे यांचे मत

3

नेवासा :

ग्रामीण भागातील खेळाडूंचे भवितव्य घडविण्यासाठी जिल्हा असोसिएशनने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत नेवासा तालुक्यातील भेंडा येथील कबड्डीपटू राम आढागळे या खेळाडूने व्यक्त केले.


या बाबत या खेळाडुने मांडलेली व्यथा अशी की
४७ व्या राष्ट्रीय स्पर्धेची निवड झाली आणि मुख्य स्पर्धेला पण सुरवात झाली सर्व निवड झालेल्या स्पर्धेकानचे मी प्रथम अभिनंदन करतो व भावी वाटचालीस शुभेच्छा देतो


या निमित्ताने एक धोक्याची घंटा असल्याने त्याने नमूद केले की खेळाडूच्या निवड चाचणी नंतर खरंच काही गोष्टींच विचार करायला भाग पाडतीलअश्या काही घटना या निवडचाचणीत घडून आल्या.आपला अहमदनगर जिल्हा आणि निवड चाचणी..या जिल्ह्यातून चार खेळाडू महाराष्ट्र ट्रेनींग संघ निवडसाठी घेतले पण मेन ट्रेनींग संघात २० पैकी एकही खेळाडू निवड होऊ शकला नाही याबाबत खंत ही व्यक्त केली.


या मध्ये खेळाडू असतील किंवा इतर सदस्य असतील त्याच्या गप्पा असतील किंवा प्रत्यक्ष खेळ असेल हे सर्व बघितल्यानंतर आपले हे खेळाडू पुढ का नाही जाऊ शकले ? हा यक्ष प्रश्न सर्वांसमोर आला. काय असतील याची कारणे ती म्हणजे खेळाडूंची फिटनेस..,खेळाडूंचा खेळ व जिल्हा असोसियशनच खेळाडूंकडे नसलेल लक्ष
प्रत्येक खेळ टिकवायला वयाचं लिमिट असते पण फिटनेस आणि खेळ मेंटेन करण्यासाठी ए 1 खेळाडूंना महिन्याकाठी ४० ते ५० हजार आणि सामान्य खेळाडूंना १० ते १५ हजार रुपये खर्च येतो.पुढे ही वय आणि प्रापांचीक गोष्टी थांबत नसतात.

हे सर्व गोष्टी आपण सर्व सदस्य आणि खेळाडू म्हणून जाणतो तरी पुन्हा हा हिशोब इथं मांडला.जर असंच चांगले खेळाडू डावलन्याचे काम होत राहीले तर खेळाडू भेटणं ही आपल्या जिल्ह्यातून मुश्किल होईल याच असोसिएशन आणि सिलेक्शन कमिटीने विचार करावा असे आवाहन केले.


का खेळाडूंना जिल्हा बदलून खेळण गरजेचं आहे ? समोर ही तशीच उदाहरण आहेत जेव्हा ती बाहेर खेळली तेव्हाच अस्लम इनामदार व श्रीकांत जाधव सारखी खेळाडू ही मुख्य आणि महत्वाच्या टीम मध्ये आली.


तसे पाहिले तर सर्वात मोठा हा अहमदनगर जिल्हा आहे २४ तालुके असलेला आणि एवढी एकाचड एक खेळाडू असणारे हे त्यातील तालुके.. तरीही जर खेळाडू पुढे जात नसतील तर पुढचं भविष्य इतर खेळा प्रमाणेच असेल त्याना त्याचे लॉट पुरते पण खेळाडू भेटत नाही तर टीम होणं अवघडच असत.

तशी संक्रांत या खेळावर येऊ नये यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहू.


चाचणी च्या ठिकाणी चांगला खेळ खेळून सुध्दा आपले खेळाडू कॅम्पसाठी सुद्धा खेळू शकत नही हे दुर्दैवच म्हणावं लागेल. असोसिएशन ने जर पुर्ण जोर लाऊन प्रयत्न केला तर निश्चितच काहीतरी होऊ शकत असा विश्वास मला वाटतो कारण असं म्हणतात की बोलणाऱ्याचे हुलगे विकतात आणि न बोलणाऱ्याचे सोन ही माती मोल असत.

या सर्व गोष्टीचा विचार सर्व प्रकारच्या खेळाच्या असोसिएशन ने करावा अशी विनंती त्याने यावेळी बोलताना केली आणि इथून पुढे आपल्या या खेळाडूंच भविष्य उज्वल करण्याचा पर्यंत पुढच्या कालावधीत आपल्याकडून नक्कीच प्रयत्न होईल अशी अपेक्षा व्यक्त केली व असोसिएशनने यावर आपले मत ही खेळाडूंसाठी प्रकट करावे असे आवाहन केले.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here