’गंगूबाई’मुळे आलिया भट, संजय लीला भन्साळीला समन्स….

1

मुंबई 

 

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गंगुबाई काठीयावाडी या चित्रपटाला विरोध दर्शवणारी याचिका मुंबईतील माझगाव कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे.

 

या चित्रपटातील मु‘य नायिका म्हणून काम केलेल्या अभिनेत्री आलिया भट, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासह चित्रपटाच्या लेखकाला हे समन्स बजावण्यात आलेले आहेत. २१ मे रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश माझगाव कोर्टाने आलिया भट , दिग्दर्शक संजय भन्साळी व लेखकाला दिलेले आहेत.

 

गंगुबाई काठियावाडी या आगामी प्रदर्शित होणार्‍या चित्रपटामध्ये दाखविण्यात आलेला विषय हा चुकीच्या पद्धतीने हाताळण्यात आलेला असून या मधील दाखवलेल्या गोष्टी या खोट्या असल्याचा आरोप गंगुबाई काठियावाडी यांच्या कुटुंबियांनी केलेला आहे.

 

त्यानुसार या संदर्भात माझगाव कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती.

 

न्यायालयाने ही याचिका दाखल करत दिग्दर्शक संजय भन्साळी, अभिनेत्री आलिया भट व लेखकाला २१ मे रोजी या संदर्भात न्यायालयामध्ये हजर राहून आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिलेले आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here