कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकान चालकांवर प्रशासनाची धडक कारवाई

कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकान चालकांवर प्रशासनाची धडक कारवाई, सात दिवसांसाठी बारा दुकाने सील

कर्जत :
सरकारने दिलेले कोरोना नियम न पाळल्याने त्यांचे उल्लंघन करणारे कर्जत शहरातील सहा आणि मिरजगाव येथील सहा दुकानावर कर्जत तालुका प्रशासनाने सात दिवस दुकाने बंद करण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, मुख्याधिकारी गोविंद जाधव आणि गटविकास अधिकारी अमोल जाधव फौजफाट्यासह सहभागी झाले होते.
कोरोनाची दुसरी लाट सक्रिय झाल्याने सर्वसामान्य नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी केले आहे.
        बुधवारी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी कर्जत शहराला अचानक भेट देत बाजारपेठेत आपला मोर्चा वळविला. यावेळी त्यांना अनेक दुकानात ग्राहक व मालकाने मास्क परिधान न केलेले निदर्शनास आले यासह सॅनिटायजर उपलब्ध नसणे, सामाजिक अंतरपथ्य आणि कोरोनाचे नियम पायदळी तुडविल्याचे लक्षात आल्याने कर्जत शहरातील सहा दुकानांवर सात दिवस बंद करण्याची कारवाई मुख्याधिकारी गोविंद जाधव यांना करण्याची सुचना दिली होती त्यानुसार मुख्याधिकारी जाधव यांनी गुरुवारी सदर दुकान चालकांवर सात दिवसाची कारवाई पार पाडली.
गुरुवारी तहसीलदार नानासाहेब आणि गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी मिरजगाव येथे बाजारपेठेची पाहणी करीत असताना त्यांना देखील शासनाने दिलेले कोरोना नियम उल्लंघन करणाऱ्या सहा दुकानावर सात दिवस बंद करण्याची कारवाई पार पाडली. प्रशासनाने उचलली कडक पावले पाहता सर्व व्यापारी आणि ग्राहकांनी कोरोना नियम पुरेपूर पाळण्याची तयारी अंगिकारली आहे.
कर्जत शहर कारवाईत मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्याबरोबर आरोग्य विभागाच्या रुपाली भालेराव, राकेश गदादे, संतोष समुद्र, रवींद्र नेवसे, विलास शिंदे, कल्याण पवार, अग्निशमन विभागाचे कर्मचारी, पो कॉ बळीराम काकडे तर तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्या पथकात ग्रामविकास अधिकारी प्रताप साबळे, पोलीस कर्मचारी रवींद्र वाघ, जितेंद्र सरोदे, तलाठी प्रनोती घुले, ग्रामपंचायत कर्मचारी बापू घोडके, दत्ता तुपे सहभागी झाले होते.
सार्वजनिक ठिकाणी होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमी साजरी न करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश – प्रांताधिकारी अर्चना नष्टे
         पुढील आठवड्यात साजरी होणारी होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमीचा सण गर्दीच्या अनुषंगाने दि २८ मार्च ते २ एप्रिल या काळात सार्वजनिक ठिकाणी, सभागृहे, खाजगी मोकळ्या जागेत, हॉटेल्स आणि गृहनिर्माण संस्थेच्या मोकळ्या जागेत साजरी करण्यात येवू नये असे आदेश जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी दिले आहेत. या आशयाचे प्रसिद्धी पत्रक प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी प्रसिद्ध केले आहे. 
2) कोव्हीड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि नियंत्रण आणण्यासाठी कर्जत शहरासाठी मुख्याधिकारी गोविंद जाधव यांची तर ग्रामीण भागासाठी तहसीलदार नानासाहेब आगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here