Earth Hour..: ‘अर्थ आवर’साठी काही मिनिटांची प्रतीक्षा…

1

आज रात्री साडेआठ ते साडेनऊ, तासाभरासाठी जगभरात लाईट बंद होणार


नवी दिल्ली:
आज रात्री जगभरातील लोक अर्थ अवर साजरा करणार आहेत. पृथ्वीच्या संरक्षणासाठी आणि सुधारणेसाठी मार्चचा शेवटचा शनिवार दर वर्षी अर्थ अवर म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रात्री ८.३० ते ९.३० या वेळेत जगभरातील कोट्यावधी लोक एका तासासाठी लाईट बंद करतात. पृथ्वीला अधिक चांगले करण्यासाठी आपला एकताचा संदेश या माध्यमातून दिला जातो.


पर्यावरण संबधीत समस्यांविषयी लोकांना जागरूक करणे आणि त्याच्या सुरक्षिततेत हातभार लावण्यासाठी त्यांना पुढे आणणे हे यामागचं उद्दीष्ट आहे. यावर्षी या कार्यक‘माचे महत्त्व कोरोना साथीच्या निमित्ताने आणखी वाढले आहे. ३१ मार्च २००७ रोजी ऑॅस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात प्रथमच अर्थ अवरचं आयोजन करण्यात आलं होतं. हळूहळू हा दिवस जगभर साजरा होऊ लागला आहे.


वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर (डब्ल्यूडब्ल्यूएफ) ने २००७ मध्ये अर्थ अवर डे सुरू केला. अर्थ अवर फाउंडेशनचे सह-संस्थापक अँडी रिडले यांनी ेेंंइ च्या सहकार्याने ही मोहीम सुरू केली. २००८ मध्ये अर्थ अवर डेमध्ये ३५ देशांनी सहभाग घेतला होता. यावर्षी, १७८ देशांमध्ये अनावश्यक वीज रात्री ८.३० ते ९.३० पर्यंत बंद केली जाणार आहे. अर्थात यावेळी संपूर्ण जगात ब्लॅक आऊट होईल. बरेच लोक मेणबत्त्या पेटवून अर्थ अवर देखील साजरे करतात. पर्यावरण तज्ञांच्या मते, ेेंंइ च्या या जागतिक मोहिमेची हवामान बदल आणि ग्लोबल वार्मिंगच्या समस्येवर लढायला मदत करेल.


भारत २००९ मध्ये या मोहिमेचा भाग बनला होता. यात ५८ शहरांमधील ५० लाखांहून अधिक लोक सहभागी झाले होते. २०१० मध्ये भारतातील १२८ शहरांतील ७० लाखांहून अधिक लोकांनी या उपक‘मात भाग घेतला होता. यानंतर ही सं‘या वाढतच आहे. राजधानी दि‘ीतील वीज वितरण कंपन्यांनी हा कार्यक‘म यशस्वी करण्यासाठी त्यांच्या ग—ाहकांना जागरूक करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.


अर्थ अवर डे दरम्यान जगभरातील अनेक ऐतिहासिक इमारतींची लाईट बंद केली जाते. यामध्ये न्यूयॉर्कमधील एम्पायर वर्ल्ड बिल्डिंग, दुबईतील बुर्ज खलिफा, पॅरिसमधील आयफेल टॉवर आणि अथेन्समधील अ?ॅक‘ोपोलिस अशा २४ जगप्रसिद्ध वास्तूंचा समावेश आहे. भारतातील अर्थ अवर दरम्यान राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि इंडिया गेटसह अनेक ऐतिहासिक वास्तूंची लाईट बंद केली जाते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here