घोडच्या पाण्यासाठी पाणीवापर संस्था सरसावल्या….

0

श्रीगोंदा : दादा सोनवणे

श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत या ठिकाणी शेतीसाठी पाण्याला पाणी मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. ही बाब गावचे ग्रामपंचायत सदस्य शहाजी इथापे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी गावातील पाटपाणी वापरणाऱ्या लोकांना एकत्र करून पाणीपट्टी  भरण्यास प्रोत्साहित केल्याने नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

त्यामुळे नागरिकांतून मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळताना दिसत होता.श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडे या गावातून घोडचा डावा कालवा वाहतो. मात्र गावातून रेग्युलर पाणीपट्टी भरली जात नसल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी कमी प्रमाणात उपलब्ध होत असे. मात्र याबाबत कोणीही आजपर्यंत आवाज उठवला नसल्याने गावातील पाणी वापर संस्था थकीत मध्ये गेल्या होत्या. 

मागील काही काळात ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. त्यात शहाजी इथापे हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून याबाबत सविस्तर माहिती घेतली. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की पाणी वापर संस्था थकीत आहेत.

त्यामुळे आपल्याला पाणी मिळत नाही. त्यानी याबाबत सोशल मीडियावरून लोकांना आवाहन केले. त्यानुसार सर्वांनी आज सकाळी बस स्थानक परिसरात एकत्र येऊन सोशल डिस्टन्स ठेवत मिटिंग घेतली. सर्व माहितीचे नागरिकांना वाचन करून दाखवले.

यास नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. सभेत ठरल्यानुसार शिवकृपा पाणीवापर संस्था चारी ने भरणे असल्यास 450 रुपये प्रति एकर प्रती वर्ष , उचल पाणी 2000 रुपये प्रति मोटर प्रति वर्ष लिप्ट नुसार सर्वांनी रक्कम जमा करायची आहे. त्याची रीतसर पावती दिली जाणार आहे.

तसेच या पाणीपट्टी ची शेतकऱ्याच्या उसबीलातून कपात केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या छोट्या सभेस गावातील सोसायटीचे चेरमन व्हा चेरमन सरपंच उपसरपंच तसेच पाणी वापर संस्थेचे सर्व संचालक मंडळ यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here