पहिल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल !

1

संगमनेर :

पहिल्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत देशात सर्वाधीक सहभाग नोंदविणार्‍या महाराष्ट्र संघाने राष्ट्रीय स्पर्धेतही यशाची पताका फडकाविली आहे. गेले चार दिवस ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने 24 गुणांसह तीन सुवर्ण आणि तीन रौप्य पदकांची कमाई करीत संपूर्ण स्पर्धेवर राज्याची छाप सोडली. तामीळनाडूच्या संघाने प्रत्येकी एक सुवर्ण आणि रौप्य पदकासह दुसरे तर कर्नाटक आणि गुजरातच्या संघाने प्रत्येकी एक सुवर्ण आणि एक कांस्य पदक पटकावित संयुक्तपणे तिसरा क्रमांक पटकाविला.

राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् फेडरेशनने गेल्या 24 ते 27 मार्चदरम्यान ‘ऑनलाईन’ पद्धतीने राष्ट्रीय योगासन स्पर्धेचे आयोजन केले होते. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये क्रिडा मंत्रालयाने योगासनांना खेळाचा दर्जा दिल्यानंतर पहिल्यांदाच या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सहा गटांमध्ये घेण्यात आलेल्या योगासनांच्या विविध प्रकारांमध्ये त्रिपूरा राज्य व मध्यप्रदेशच्या संघाने प्रत्येकी एक रौप्य, पश्‍चिम बंगालच्या संघाने दोन कांस्य, तर हरियाणा व तेलंगणा येथील संघाने प्रत्येकी एका कांस्य पदकाची कमाई केली. ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या या पहिल्याच स्पर्धेला देशभरातील विविध राज्यांच्या संघांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

योगासनांच्या विविध कठीण मुद्रा सादर करीत मुलांच्या लहानगटात महाराष्ट्राच्या संघातील प्रीत निलेश बोरकरने 74.33 गुणांसह सुवर्णपदक पटकावित महाराष्ट्राच्या यशाचा झेंडा फडकाविला. त्रिपूराच्या रेहान आलम याने 73.08 गुणांसह रौप्य, हरियाणाच्या दिपांशूने 72.50 गुणांसह कांस्य पदक पटकाविले. याच वयोटातील मुलींमध्ये तामीळनाडूच्या नव्व्या सत्या हरिश हिने 81.92 गुणांसह सुवर्ण, महाराष्ट्राच्या तृप्ती रमेश डोंगरेने 81.75 गुणांसह रौप्य तर पश्‍चिम बंगालच्या सावली गांगुली हिने 80.58 गुणांसह कांस्य पदक मिळविले.

 राष्ट्रीय पातळीवर इतक्या व्यापक प्रमाणात ऑनलाईन पद्धतीने बहुधा पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या या स्पर्धेत देशभरातील 5 हजार 328 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यातील 498 स्पर्धक राज्यांचे प्रतिनिधीत्व करत राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले. विजेत्या स्पर्धकांना स्पोर्टस् अथोरिटी ऑफ इंडियाचे डायरेक्टर जनरल संदीप प्रधान यांच्या उपस्थितीत महासंघाचे अध्यक्ष डॉ.ईश्‍वर बसवरेड्डी व महासचिव डॉ.जयदीप आर्य यांच्या हस्ते पारितोषिके दिली गेली. देशभरातील 75 पंचांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here