घाणेगाव येथील 2 शाळा खोल्यासाठी 17 लाख 50 हजारांचा निधी मंजुर- सभापती गणेश शेळके

0

सुपा :

पारनेर तालुक्यातील घाणेगाव येथील प्राथमिक शाळेच्या खोल्याच्या बाधकाम साठी १७ लाख ५o हजार निधी शाळा खोल्या मंजूर केल्या आहेत.

 

घाणेगाव येथील 2 शाळा खोल्या गेल्या सहा वर्षांपासून निरलेखित केलेल्या होत्या मुलांना बसण्यासाठी खूप अडचणी निर्माण झाल्या होत्या परंतु मध्यंतरी च्या काळामध्ये बबन वाबळे यांनी त्यांच्या खाजगी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जवळपास 2 ते 3 वर्ष बसण्यासाठी मदत केली .

 

ग्रामस्थांनि व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य तत्कालीन सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, परांडे सर ,विकास वाबळे,पवन वाबळे,अमोल वाबळे,गणेश वाबळे,अनिल वाबळे व ग्रामस्थ यांनी वारंवार पंचायत समिती कडे पाठपुरावा केला. आज शाळा खोल्या मंजूर केल्याने वेगळे समाधान मला वाटते, चिमुकल्यांना बसण्यासाठी आपण एक सुसज्ज अशी इमारत उभी करतोय याचे ममस्वी समाधान मिळते. असे पारनेर पंचायत समिति सभापती गणेश शेळके यांनी दैनिक राष्ट सह्यादी शी बोलताना सागातिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here