हीच आमुची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे, मानसाने मानसाशी माणसासम अंतर ठेवून वागणे…

नारायणगाव :
मार्च 2020 पासून मार्च 2021 अखंड वर्ष संपूर्ण देशात आणि जगात हे कोरोना महामारीत गेले आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने घेतलेले निर्णय हे सर्वसामान्यांपासून ते महालात राहणाऱ्या मानव जातीचा विचार करणारे ठरले . कोरोनाची खरी झळ ही हातावरती पोट भरणाऱ्या सामान्य कारागिरांना प्रचंड प्रमाणात सहन करावी लागली आहे .
त्यामुळे आत्ता लोक डाऊन हा शब्द जरी उच्चारला तरी पुन्हा उपासमारीची वेळ येते की, काय? अशी शंका कामगारांच्या मनात येऊन जाते. कोरोणाचे जेवढे नियम पाळायचे असतील तेवढे पाळले गेले पाहिजेत. पण सामान्य कारागिरांना लाँक डाऊन हे परवडत नाही .जे कोणी फर्निचरचे काम करणाऱ्या व्यक्ती असतात .ते फर्निचर कर्मचाऱ्यांना घरी येऊ देत नाहीत. त्यामुळे फर्निचर करणाऱ्या कारागिरांवर  लहान मोठी काम बंद होतात. त्यामळे मोठ्या प्रमाणात उपासमारीची वेळ येते.
हीच आमुची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे. मानसाने मानसाशी माणसासम अंतर ठेवून वागणे.  कोरोनाचे नियम पाळावेत .महाराष्ट्र शासनाने लाँकडाऊनचे नियम कठोर करावेत. परंतु लाँक डाऊन करू नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here