जनता महाविद्यालयात भित्तिपत्रक स्पर्धा उत्साहात

0
चिचोंडी :
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या रूई छत्तीसी येथील जनता कला व विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्र व प्राणीशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भित्तिपत्रक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे नवनिर्वाचित खजीनदार मुकेश मुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुरेश बाबर हे होते. संस्थेचे खजीनदार मुकेश मुळे, प्राचार्य डॉ सुरेश बाबर, उपप्राचार्य डॉ. डी.एस तळुले , विज्ञान विभागप्रमुख रविराज सुपेकर, प्रा प्रियंका पठारे आदी मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय रविराज सुपेकर यांनी करून दिला. संस्थेच्या नवनिर्वाचित खजीनदार पदी निवड झाल्याबद्दल मुकेश मुळे यांचा महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी स्वर्गीय माधवरावजी मुळे बहुद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने विज्ञान शाखेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिंनी देण्यात येणारे पारितोषिक वितरण करण्यात आले. यात विज्ञान शाखेत 85 टक्के गुण प्राप्त करून मुलीमध्ये प्रथम आलेल्या कावेरी कोतकर व मुलांत प्रथम आलेल्या योगेश बोरूडे याना देण्यात आला.
 कार्यक्रमाचे उदघाटक मुकेश मुळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ बाबर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यावेळेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भूगोल उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा राजेंद्र गोरे यांनी केले. प्रा  प्रियंका पठारे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here