आंबेगाव तालुक्यात उन्हाळी कांदा काढण्याची लगबग

0

आंबेगाव :-

शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उन्हाळी कांदा लागवड केली होती मात्र अतिवृष्टीमुळे ती रोपे वाया गेलेली त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने कांदा बी विकत घ्यावे लागले त्यासाठी त्यांनी प्रति पायली १२ ते १३ हजार रुपये मोजावे लागले त्यामुळे कांद्याचे उत्पादन चांगले झाले नाहीच शिवाय बाजार भाव पडले त्यामुळे कांदा उत्पादकांची तिहेरी नुसकान झाले आहे कांद्याला डेंगळे आल्याने त्याचाही परिणाम कांदा उत्पादनावर झाला आहे

आंबेगाव तालुक्यात उन्हाळी कांदा काढणी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे मात्र बाजारात हा काढलेला कांदा कवडीमोल भावाने विकला जात असल्याने शेतकरी त्रस्त झाले असल्याचे वळती येथील व शेतकरी दिलीप भोर व जारकरवाडी येथील शेतकरी राजेंद्र काकडे यांनी सांगितले

 

साधारणपणे शेतकऱ्यांनी डिसेंबर ते जानेवारी महिन्यात आपल्या शेतात कांदा लागवड केली होती या कांद्यावर रोग पडू नये म्हणून तणनाशकाची फवारणी केली होती साधारण कांदा पिकाला एकरी ३५ ते ४० हजार रुपये खर्च झाला होता कांद्याच्या पिकाला पाणी जास्त लागत असल्याने ओल पाहून शेतकऱ्यांनी पाणी दिले होते साधारण तीन ते साडेतीन महिन्यात कांदा काढणीला आला आहे.

 

तालुक्यात फुरसुंगी जातीचा कांदा मोठ्या प्रमाणात लावला जातो मजुरांची वानवा असल्याने सावडीने किंवा रोजाने महिलेला अडीचशे ते तीनशे रुपये रोज घेऊन ही कांदा काढणी सुरू आहे. बाजारात या काढलेल्या कांद्याला दहा किलोस १०० ते १३० रुपये एव एवढा कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याचे शेतकरी घायकुतीला आलेला आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कांदाचाळी करून त्यामध्ये कांदा साठवण करून ठेवण्याची लगबग चालु ठेवली आहे उन्हाच्या तडाख्यात ही कांदा काढण्याचे चित्र तालुक्यातील मंचर घोडेगाव लोणी धामणी पेठ अवसरी खुर्द भागडी वळती रांजणी कळंब आदी गावांमध्ये सुरू असल्याचे चित्र आहे .

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here