यंदाही परीक्षे विनाच होणार पहिली ते आठवीचे विद्यार्थी पास ; परंतु ‘हे’ असतील निकष

2

राज्यातील कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालं. दरम्यान याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा न देता पास करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत घोषणा केली.

 

 

राज्यात कोरोनाची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. गेल्या काळात आपण ऑनलाईन, ऑफलाईन, युट्यूब, गुगल यामाध्यमातून आपण शिक्षण सुरु ठेवलं. काही ठिकाणी शाळा सुरु झाल्या त्या ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण झाले नाही. पण विविध माध्यमातून शिक्षण पोहोचावे असा प्रयत्न होता अस वर्षा गायकवाड म्हणाल्या.

 

 

पण सध्या कोरोनाची स्थिती पाहता पहिली ते आठवीचे विद्यार्थ्यांचे वर्षभराचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे. त्यात या विद्यार्थ्याने कशाप्रकारे अभ्यास केला हे बघितले पाहिजे. पण आताची परिस्थिती बघता हे यावर्षी होण शक्य नाही. राज्यातील जे पहिली ते आठवीचे जे विद्यार्थी आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करुन त्यांना पुढच्या वर्गात पाठवण्यात येणार आहे, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

2 COMMENTS

  1. I was just looking for this info for a while. After six hours of continuous Googleing, finally I got it in your web site. I wonder what is the lack of Google strategy that don’t rank this type of informative web sites in top of the list. Usually the top websites are full of garbage.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here