शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक प्रकरणात मुथा पती-पत्नी जेरबंद..!

29

माळवाडगांव: शेतकऱ्यांना कोट्यवधींचा चुना लावून पसार झालेल्या व्यापारी मुथ्था प्रकारणातील दोघांना जेरबंद केले. मुख्य आरोपीचा भाऊ गणेश रामलाल मुथा व त्याची पत्नी आशा गणेश मुथा यांना पोलिसांनी जळगाव येथून अटक केली. त्यांच्याकडून एक चारचाकी, एक दुचाकी व 50 हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव, मुठेवाडगाव, खानापूर, भामाठान यासह परिसरातील अनेक शेतक-यांना भुसार माल खरेदी करून कोट्यवधी रुपयांना गंडा घालून, माळवाडगांव येथील व्यापारी रमेश मूथ्था हा आपल्या कुटुंबियांसह ६ फेब्रुवारी रोजी पसार झाल्याची घटना घडली होती, यासंदर्भात ९ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र यासंदर्भात पोलीस तपास संथ गतीने चालू असल्याने, पीडित शेतक-यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झालेली असतांना, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी, अप्पर पोलीस अधीक्षका डॉ दिपाली काळे व डीवायएसपी संदीप मिटके यांना, मुथ्था प्रकरणात जातीने लक्ष घालण्याचे आदेश दिले, त्यानंतर तब्बल १९ दिवसानंतर, मुथ्था प्रकरणी पोलिसांना मोठं यश हाती आल आहे. ज्यात पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या पथकाने, जळगाव येथून मुथ्था प्रकरणातील दोघांना अटक केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली असून, भुसार व्यापारी मुथ्था प्रकरणातील पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक करून पसार झालेल्या मुथा परिवाराने अनेक वेळा मोबाईल बदलले, त्यामुळे त्यांचा सुगावा लागत नव्हता. पोलिसांनी तांत्रिक पाठपुरावा केला; मात्र तरी ते हाती लागत नव्हते. त्यांच्या संपर्कातील काही लोकांच्या मोबाईल चे लोकेशन आणि कॉल रेकॉर्ड वरून मुथा पती-पत्नीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.

29 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here