RTPCR चाचणीसाठी रुग्णांकडून जादा दराने पैसे घेणार्‍या लॅबोरेटरीवर जिल्हाधिकाऱ्यांनी टाकला छापा ….

19

नांदेड :

राज्यात शनिवारी पुन्हा विक्रमी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात काल तब्बल 49 हजार 447 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. काल नवीन 37821 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2495315 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 401172 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 84.49% झाले आहे.

 

 

शहरातील थायरोकेअर पॅथॉलॉजी लॅबकडून कोरोनाच्या RTPCR चाचणीसाठी रुग्णांकडून जादा दराने पैसे घेऊन पिळवणूक होत असल्याची माहिती नांदेड जिल्हा प्रशासनास मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित लॅबोरेटरीवर छापा टाकला आणि लॅबोरेटरीला सील ठोकले.

 

 

त्यावर महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेशसिह बिसेन यांच्या तक्रारीवरून थायरोकेअर लॅब ने 8 रुग्णांकडून कोविड आरटीपीसीआर चाचणी साठी 16 हजार रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले. एकूणच सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्तीची रक्कम थायरोकेअर ने घेतली आहे. त्यानुसार आरोपी शशिकांत चंद्रकात शेळके व आनंद राजाभाऊ बोकन यांच्यावर वाजीराबाद पोलिसांनी गुन्हा क्रमांक 116/2021भारतीय दंड संहितेच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 51 (ब )आणि साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 च्या कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.

 

 

थायरोकेअर पॅथॉलॉजी लॅबकडून कोरोनाच्या चाचणीसाठी रुग्णांकडून अतिरिक्त रुपये घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ .विपीन इटनकर हे शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास डॉक्टर लेन येथील थायरोकेअर पॅथॉलॉजी लॅबवर महापालिकेच्या डॉ. सुरेशसिंह बिसेन यांच्या वैद्यकीय पथकासह पोहचले. तपासणी दरम्यान समोर आलेल्या अभिलेखानुसार सरकारने आरटीपीसीआर या कोविड तपासणीचा दर 600 रुपये निश्चित केला असतांना थायरोकेअर लॅब मात्र रुग्णांनकडून 2000 रुपये दराने रुग्णांची तपासणी करून लूट करत असल्याचे निदर्शनास आले.

 

 

राज्यात शनिवारी पुन्हा विक्रमी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात काल तब्बल 49 हजार 447 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. काल नवीन 37821 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2495315 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 401172 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 84.49% झाले आहे.

 

 

19 COMMENTS

 1. This is the fitting weblog for anybody who wants to seek out out about this topic. You understand so much its almost hard to argue with you (not that I really would want…HaHa). You definitely put a brand new spin on a subject thats been written about for years. Nice stuff, just nice!

 2. I know this if off topic but I’m looking into starting my own weblog and was wondering what all is needed to get setup? I’m assuming having a blog like yours would cost a pretty penny? I’m not very web smart so I’m not 100 sure. Any suggestions or advice would be greatly appreciated. Cheers

 3. Wow, superb blog layout! How long have you been running a
  blog for? you made blogging glance easy. The whole look
  of your web site is wonderful, as well as the content material![X-N-E-W-L-I-N-S-P-I-N-X]I just couldn’t depart your web site before suggesting that I actually
  loved the standard info an individual provide for
  your visitors? Is going to be again steadily to check up on new posts.

  Check out my homepage voipxhub.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here