सुदृढ शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी क्रिडा स्पर्धा काळाची गरज सभापती क्षितीज घुले

ढोरजळगांव:

 

आभासी जगातून भरकटलेल्या तरुणाईला मार्गावर आणण्यासाठी क्रिडा स्पर्धा उपयुक्त आहेत.खेळामुळे शरीरात व मनात सकारात्मक उर्जा निर्माण होते.त्यामुळे सुदृढ शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी क्रिडा स्पर्धा काळाची गरज आहे असे प्रतिपादन शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी केले.

 

आव्हाणे बुद्रुक ता.शेवगाव येथे गणेश क्रीडा क्लबने आयोजित केलेल्या टेनिस बाँल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन डॉ. घुले यांच्या हस्ते झाले ,यावेळी ते बोलत होते.
यावेळी डॉ. घुले म्हणाले की,गेले वर्षभर कोरोनाच्या संसर्गामुळे शारीरिक व मानसिक आरोग्याचे महत्त्व सर्वांना समजले आहे.

 

ते जपण्यासाठी वेगवेगळे मैदानी खेळ , क्रिडा स्पर्धाची गरज निर्माण झाली आहे. तरुणाईला मैदानावर आणण्यासाठी स्पर्धा व खेळाची गरज आहे. तालुक्यात माजी आमदार नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले यांनी नेहमीच चांगले काम करण्याची प्रेरणा निर्माण केल्यामुळे युवकांसाठी सकारात्मक आणि आशादायक वातावरण आहे.

 

स्पर्धेतील विजेत्या संघासाठी संजय कोळगे यांनी अकरा हजार एकशे अकरा रुपयांचे प्रथम,राहुल गोर्डे ,राजेंद्र बैरागी यांनी सात हजार सातशे सत्याहत्तर रुपयांचे द्वितीय,दिपक चोथे यांनी तीन हजार तीनशे तेहतीस रुपयांचे त्रुतीय पारितोषिक दिले आहे.

 

 

बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक संजय कोळगे,ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे संचालक बबन भुसारी, पंचायत समितीचे माजी उपसभापती अंबादास कळमकर, वडुलेचे सरपंच प्रदिप काळे,मळेगावचे सरपंच सुरेश घोरपडे,फलकेवाडीचे सरपंच बाळासाहेब मरकड,ब-हाणपूरचे सरपंच सुभाष वाणी,केदारनाथ मुरुडकर,साईनाथ झाडे,क्रुष्णा सातपुते, रोहन साबळे,डॉ. सिताराम निकम, रवींद्र सातपुते, संकेत वांढेकर,रामदास कोळगे,सुधाकर चोथे,दत्तात्रय मोकळ ,कोंडीराम आहेर,अनिल खैरे आदी प्रमुख उपस्थित होते.

 

8 COMMENTS

  1. Hi there, I discovered your site via Google even as searching for a similar matter, your website came up, it appears to be like great. I’ve bookmarked it in my google bookmarks.

  2. Wow, wonderful blog structure! How lengthy have you ever been blogging for? you made blogging look easy. The whole glance of your website is great, as smartly as the content material!

  3. Excellent read, I just passed this onto a colleague who was doing a little research on that. And he just bought me lunch since I found it for him smile Thus let me rephrase that: Thanks for lunch!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here