Big News : नगर जिल्हा बंद जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचा आदेश, ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध

1

अत्यावश्यक सेवा वगळता नगर जिल्हा बंद
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचा आदेश, ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध


नगरः

वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यापार व आस्थापना ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सोमवारी दिले. राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यातही दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली असून त्याशिवाय आठवड्यातील सातही दिवस आता अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने उघडणार नाहीत, असे जिल्हाधिकारी भोसले यांच्या आदेशाने स्प्षट झाले आहे.


अत्यावश्यक सेवांमध्ये रुगणालये, रोगनिदान केंद्रे, क्लिनीक, औषधालये व अन्य वैद्यकीय व आरोग्य विषयक सेवा यासह किराणा, भाजीपाला, दुग्धालये, बेकरी, अन्नपदार्थ विक्रीची दुकाने, सार्वजनिक वाहतूक सुरू राहणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा मान्सूनपुर्वचे कामकाज, वर्तमानपत्रांची वितरण व्यवस्था तसेच हॉटेलची केवळ पार्सल व्यवस्था सुरू राहणार आहे. कृषी विषयक सेवांनाही परवानगी देण्यात आली आहेत. याशिवाय आपत्ती व्यवस्थापनाने अत्यावश्यक म्हणून घोषित केलेल्या सेवा सुरू राहणार आहेत.
सार्वजनिक क्रिडांकणे, उद्याने बंद राहणार आहेत. दुकाने, मार्केट आणि मॉल बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍या दुकानांच्या परिसरात सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक असतील. तेथील मालक व कामगारांचे कोरोना लसीकरण करणे गरजेचे आहे. अत्यावश्यक सेवेच्या दुकानात पारदर्शक काच किंवा पडदा लावावा.


रिक्षासाठी चालक व दोन प्रवासी, टॅक्सीला परवान्याच्या ५० टक्के परवानगी, बसमध्ये मंजूरीइतकेच प्रवासी बसू शकतील. प्रवाशांनी मास्क न वापरल्यास ५०० रुपये दंड असेल. वाहनांचे प्रत्येक फेरीनंतर निर्जंतूकीकरण करणे बंधनकारक असेल. कोरोना चाचणी निगेटीव्ही असल्याचे प्रमाणपत्र चालकांकडे असणे बंधनकारक असणार आहे. प्रमाणपत्र नसल्यास १००० रुपये दंड करण्यात येणार आहे.


सहकारी, सार्वजनिक आणि खासगी बँका, टेलिकॉम सेवा सुरू राहतील. सरकारी कार्यालये ५० टक्के कर्मचार्‍यांसह सुरू राहतील. सिनेमागृहे, नाट्यगृहे, सभागृहे, व्हिडीओ पार्लर, वॉटर पार्क, क्लब, स्विमींग पुल, जीम, क्रीडा संकुले बंद राहतील. रेस्टॉरंट बारमध्ये ग्राहकांना बसण्यास परवानगी नसेल. पार्सल सेवा, होत डिलीवरी सेवा सुरू राहील. केशकर्तनालये, स्पा, ब्युर्टी पार्लर बंद राहतील.


सर्व धार्मिक उपासना स्थळे बंद असतील. पुजा, प्रार्थना सुरू राहील मात्र बाहेरील व्यक्तीला दर्शनाची परवानगी नसेल, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here