राजुरीत मंदिर परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट….

1

राजुरी :

राजुरी येथील जुन्या गावात असणाऱ्या श्री दक्षिण मुखी हनुमान मंदिर परिसरात भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट दिसून येत असून अशा चोरांचा बंदोबस्त करणार तरी कोण? असा प्रश्न सध्या राजुरी येथील ग्रामस्थांना पडला आहे.

 

याबाबतची माहिती अशी की राहता तालुक्यातील राजुरी येथील जुन्या गावात असणाऱ्या श्री दक्षिण मुखी हनुमान मंदिर, राज राजेश्वरी भवानी देवी माता मंदिर, शहीद जवान अनिल विष्णुपंत गोरे यांचे स्मृतिस्थळ, व या परिसरातच असणाऱ्या अमरधाममध्ये गेल्या एक ते दोन महिन्यापासून विविध विकास कामे सुरू असून हे काम चालू असताना तेथे आणून टाकलेल्या काही वस्तू रात्रीच्या वेळी अज्ञात चोरटे गज, लोखंडी अँगल, बांधकामासाठी लागणारे काही साहित्य येथून काही भुरटे चोर या वस्तू घेऊन पोबारा करीत आहेत.

 

 

तसेच या भागातील मंदिर परिसरात असणाऱ्या बल्प, व अन्य साहित्य याआधीही येथून चोरीला गेलेले आहेत परंतु ग्रामस्थ याविषयी चर्चा करून सोडून देत आहे त्यामुळेच की काय ? अशा होणाऱ्या घटनांवर कोणीही कारवाई करत नसल्यामुळे अशा भुरट्या चोरांचे फावले असल्याची चर्चा सध्या सुरू असून रविवारी याच श्री दक्षिण मुखी हनुमान मंदिर परिसरात असणाऱ्या बोरवेलला नवीन नळ कनेक्शनची सुविधा श्री दक्षिण मुखी हनुमान मंदिर सुशोभीकरण समितीच्यावतीने स्वखर्चाने हे नळ कनेक्शन करून बांधकाम करण्यात आले होते.

 

 

त्याचीही तोडफोड मंगळवारी रात्री करून टाकण्यात आली असल्यामुळे राजुरी येथील नागरिकांमध्ये याबद्दल तीव्र चीड निर्माण झाली आहे अशा कृत्य करणाऱ्या व्यक्तीचा व भुरट्या चोरांचा तपास लावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होताना दिसत असून अशा घटना जर गावातील कोणी विघ्नसंतोषी करत असतील तर त्यांनी असे कृत्य करू नये अशी विनंती करण्यात येत आहे.

1 COMMENT

  1. You can definitely see your skills within the work you write. The arena hopes for more passionate writers like you who are not afraid to mention how they believe. All the time follow your heart. “We are near waking when we dream we are dreaming.” by Friedrich von Hardenberg Novalis.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here