Breaking News : पत्रकाराचे अपहरण करून खून

0

राहुरी :

दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष रोहिदास दातीर यांचे अपहरण केल्यानंतर निर्घुण खून करण्यात आला आहे. रात्री उशिरा त्यांचा मृतदेह राहुरी तालुक्यातील कॉलेज रोड परिसरात पोपळघट इस्टेट नजीक मोकळ्या मैदानात दातीर यांचा मृतदेह आढळून आला. काल त्यांचे अपहरण करण्यात आले होते.

स्कार्पिओ गाडीतून त्यांना पळवून नेले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांना ताराबादच्या दिशेने त्यांना नेण्यात आले. त्यांच्या अंगावरती मारहाण केल्याच्या प्रचंड जखमा आहेत मारहाणीत  त्यांचा मृत्यू झाला असावा आणि नंतरशहरात आणून टाकले.

ते दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष असून  एक पक्षीकही चालवत होते. शहरातील अतिक्रमण संदर्भात त्यांनी अनेक वेळा बातम्या दिल्या. त्यातूनच त्यांची हत्या झालेली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान काल डीवायएसपी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर, संगमनेर, राहुरी पोलिसांनी शोध मोहीम राबवली काही संशयितांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे.


काल दुपारी  अपहरण झालेले पत्रकार दातीर यांचा अखेर मृतदेह आढळून आल्याने राहुरी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. अपहरण करून पत्रकाराची हत्या करून करण्यात आल्याने पत्रकार तसेच सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .

मात्र पत्रकार दातीर यांची अपहरण करून हत्या कोणी व कशासाठी केली हे अद्याप समजलं नाहीये, परंतु अशाप्रकारे भरदिवसा अपहरण करून हत्या केली जात असेल तर पोलीस प्रशासन काय करत आहे, असा प्रश्न सामान्य नागरिकांमधून उपस्थित होतोय आणि दिवसाढवळ्या अशा हत्या होणार असतील तर सामान्य जनता कितपत सुरक्षित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here