टिळक रोडवरील गोदामाला आग

0

नगर : 

टिळक रोडवरील पटेल यांचे शक्ती मार्बल्स येथील कारखान्यातील एका गोदामाला आज रात्री साडेनऊ वाजता मोठी आग लागली.

महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी आत्तापर्यंत सहा बंब पाणी शिंपडले आहे, तरीही आग भडकत आहे. आगीमुळे परिसरामध्ये धुराचे लोट आणि  दुर्गंधसुटला आहे.

या गोदामामध्ये फॅब्रिकेशनचे काम केले जाते. ॲल्युमिनियमचे दरवाजे बनवले जातात. त्यासाठी काही रसायनांचा वापर होतो. त्यामुळे आग आणखीनच भडकत आहे. गोदाम पूर्णपणे लोखंडी पत्र्याने बंदिस्त आहे. त्यामुळे आग विझविताना अडचणी येत आहेत. आगीमुळे गोदामामधील विद्युत प्रवाह खंडित झाला आहे. त्यामुळे अंधार पसरला आहे.

रसायने आणि फॅब्रिकेशन जळाल्यामुळे परिसरामध्ये धुराचे लोट पसरले आहेत. या कारखान्यात मोठ्या प्रमाणामध्ये प्लायवूड आणि इतर लाकडी साहित्य आहे. आग लवकर लक्षात आल्याने स्थानिक नागरिकांनी धावपळ केली आणि पुढील मोठा अनर्थ टळला.

रात्री साडेदहानंतर देखील आग विझविण्याचे काम सुरू होते. आग लागलेल्या पत्र्याचे गोदाम फोडण्यासाठी अग्निशामक दलाने शेवटी जेसीबीचा वापर केला. आग नेमकी कशामुळे लागली हे कळू शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here