Home Nagar Ahmednagar अबब श्रीगोंद्यात कोरोना दोनशे पार… बेफिकिरी सोडा,सावध व्हा!

अबब श्रीगोंद्यात कोरोना दोनशे पार… बेफिकिरी सोडा,सावध व्हा!

0

श्रीगोंदा : प्रतिनिधी


श्रीगोंदा शहरासह तालुक्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही२४२एवढी झाली आहे शासकीय कोव्हिडं सेंटरमध्ये७५,श्रीगोंदा शासकीय ग्रामीण रुणालय१७,तर उर्वरित रुग्ण हे खासगी मध्ये उपचार घेत आहेत रुग्णसंख्या वाढली असली तरी घाबरून जाऊ नका पण हलगर्जीपणा देखील करू नका,गाफील राहू नका,काळजी घ्या,घरी रहा असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून केले जात आहे.

मला कोरोना होणार नाही,मास्क नाही लावला तरी कोरोना आपलं काही वाकड करणार नाही,कश्याला सोशल डिस्टनसिंग पाळायच अश्या वायफळ अविर्भावात समाजात बरेच लोक वावरताना आजही दिसतात चायनातला कोरोना देशात आला देशातला राज्यात राज्यातून शहरात आणि शहरातून ग्रामीण भागात आणि ग्रामीण भागातून आता आपल्या उंबऱ्यावर कोरोना येऊन उभा ठाकला आहे.

 तरी अजूनही लोक गाफील आहेत कोरोनाला फारस गांभीर्याने घेत नाहीत शासन प्रयत्न करतय पण त्यालाही सहकार्य होत नाही कोरोनाला घाबरू नका पण गाफीलही राहून चालणार नाही कारण ज्या लोकांना कोरोनाची लागण होऊन गेली त्यांचे अनुभव ऐकणे गरजेचे आहे.

 अनेक लोकांच्या हलगर्जीपणाचा फटका निष्पाप गरीब लोकांना बसत आहे कोरोनाने ग्रासल्यानंतर होणारे शारीरीक,मानसिक,आर्थिक नुकसान हे भरून न येणारे आहे कोरोनामुळे ज्यांनी आपला आई,भाऊ,बाप,बहीण,मुलगा नातेवाईक,मित्र गमावला त्याला विचारा कोरोना काय चीज आहेशासन शासनाच्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

परंतु दिवसागणिक वाढणारी रुग्णसंख्या अपुऱ्या वैद्यकीय सेवा यामुळे आपल्या सर्वांचेच आरोग्य धोक्यात आले आहे आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी रात्रंदिवस आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत परंतु काही सामाजिक जाणिव नसलेले या आरोग्ययंत्रणेलाच टार्गेट करत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here