बबन मुठे यांची नियुक्ती..

0
श्रीरामपुर:
पंढरपूर-मंगळवेढा विधान सभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे  यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपा आध्यात्मिक आघाडी कडुन भाजपाचे आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य बबन मुठे यांची नियुक्ती केली असुन दि. ७ एप्रिल ते १४ एप्रिल पर्यत पंढरपूर विधान सभा निवडणुकीत भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रचारात उतणार असल्याची माहीती भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी दिली.
श्री मुठे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत देखील उत्तर महाराष्ट्र आध्यात्मिक आघाडीचे प्रभारी पदाची जबाबदारी यशस्वीरित्या संभाळली होती .
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या आदेशानुसार भाजपा समन्वय आघाडीचे भोसले यांनी दिलेल्या माहीती नुसार पंढरपूर विधान सभा पोटनिवणुक ही भाजपाच्या दृष्टीने प्रतिष्ठेची असल्याने या मतदार संघात निवडणुक दरम्यान पूर्ण वेळ थांबुन आध्यात्मिक आघाडीचे धर्माचार्य,मठाधिपती ,वारकरी सांप्रदायातील किर्तनकार,प्रवचनकार,कथाकार, गायणाचार्य,भजनीमंडळ,सहभारुडकार यांना देखील त्या निवडुकीत सहभागी करुण घेणार आहोत तसेच पंढरपुर येथे गेल्या वर्षी आध्यात्मिक आघाडीचे दोन दिवसीय शिबिर झाले होते ते सर्व महाराज मंडळी देखिल प्रचारात सहभागी होणार असल्याचे आचार्य भोसले यांनी सांगितले.
आचार्य भोसले यांच्या समवेत वारकरी महामंडाळाचे अध्यक्ष ह,भ,प,प्रकाश महाराज जवंजाळ,धर्माचार्य समन्वयक भाऊ महाराज फुरसुंगीकर,तीर्थक्षेत्र देवस्थानचे समन्वयक राजेश महाराज देगलुरकर,पश्र्चिम महाराष्ट्र संयोजक संजय घुंडरे,प्रदेश कार्यकारणी सदस्य नंदु महाराज रणशुर आदिसह अन्य पदाधिकारी असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here