महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्यभूमी स्मारक येथील स्तूप जीर्ण झाला असून मोडकळीस आला आहे. चैत्यभूमी च्या पवित्र ऐतिहासिक स्तुपाची दुरुस्ती तातडीने झाली पाहिजे. जर कधी चैत्यभूमीचा स्तूप कोसळला तर देशभरातील आंबेडकरी जनतेचा उद्रेक होईल आणि त्याचे दुष्परिणाम मुंबई मनपाला राज्य शासनाला भोगावे लागतील असा ईशारा रामदास आठवले यांनी यावेळी दिला. चैत्यभूमीचे लवकर स्ट्र्क्चरल ऑडिट करावे अशी सूचना ना रामदास आठवले यांनी मनपा प्रशासनाला केली.
चैत्यभूमीच्या विकासासाठी निधी मनपा कडे उपलब्ध असताना स्तूपाची दुरुस्ती का केली जात नाही असा प्रश्न ना रामदास आठवले यांनी मनपा अधिकाऱ्यांना विचारला. त्यावर चैत्यभूमी ही खाजगी जागेवर उभी असल्याने मनपा ला तातडीने निर्णय घेण्यास असमर्थता दर्शविली. त्यावर प्रकाश आंबेडकर,भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर सर्व आंबेडकर बंधू आणि संबंधितांच्या सहमतीने चैत्यभूमीचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करावे अशी सूचना आठवले यांनी केली.

येत्या दि. 14 एप्रिलला बांद्रा पूर्व येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर गार्डन येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे भूमिपूजन करण्यात येणार आहे अशी माहिती आठवले यांनी दिली.