चारीत्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खुन करणार्‍या आरोपी पतीला ४८ तासांत केले जेरबंद…

1
पारनेर :
पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील चौधरीवाडी मधील नंदा पोपट जाधव वयवर्ष २४ मुळची राहणार म्हैसगांव,ता.पारनेर हिचा तिच्याच पतीने चारीत्र्याच्या संशयावरुन दि.२९ मार्चला रात्रीच्या १०:३० वाजता खुन केला व मृतदेह दि.३० मार्चला धोत्रे बु. येथील पाईनच्या तलावामधे तिच्या पोटाला दगड बांधुन पाण्यामधे फेकुन दिला होता.
पोलीस सुत्रांच्या अधिकृत माहीतीनुसार पती पत्नीच्या झालेल्या भांडणामधे,चारीत्र्याच्या संशयावरुन पतीने केलेल्या मारहाणीमधे,मृत पावलेल्या पत्नीचा मृतदेह पतीने तिच्या पोटाला दगड बांधून धोत्रे बु.।। येथील पाईनच्या तलावात फेकुन दिल्याची घटना पारनेर तालुक्यात  ढवळपुरी येथील चौधरी वाडीमधे घडली आहे.
सदर गुन्हाचा शोध घेवुन पारनेर पोलिसांनी अवघ्या ४८ तासात या निर्दयी नवर्‍याच्या मुसक्या आवळल्या आहेत.यासंदर्भात अधिकृत सुत्रांकडून मिळालेल्या माहीतीवरुन,मयत नंदा पोपट जाधव या तरुणीचा पोपट मारुती जाधव  मुळचा राहणार ठाकरवाडी, ता.राहुरी, जि.अ.नगर याच्याशी ४ वर्षापूर्वी विवाह झाला होता.काही दिवसां पासुन, ढवळपुरी येथील चौधरीवाडी येथे पत्नीसह तो वाट्याने शेती करत होता.
लग्नाला ४ वर्ष झाली तरी आपत्य नसल्याने दोघांमधे अनेकदा वाद व्हायचे.काही दिवसांनी नंदा हि गरोधर झाली.त्यानंतर मात्र पोपट नंदा हिच्या चारित्र्यावर संयश घेऊ लागला.पुढे दोघांमधील वाद वाजढतच गेले.त्याने चारित्र्याच्या संशयावरून तो नंदा हिला अनेकदा मारहाण केली. दि. २९ मार्च रोजी रात्री १०:३० चे दरम्यान पोपट व नंदा यांच्यामधे कडाक्याचे भांडण झाले.यामधे पोपट याने नंदा हिला चारीत्र्याच्या संशयावरुन बेदम मारहाण केली.यामधे पती पोपट याने पत्नी नंदा  हिला केलेल्या अमानुष मारहाणीमधे नंदाचा मृत्यु झाला.दि.३० मार्च रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मयत नंदा हिचा मृतदेह मोटरसायकलवर बांधुन पाईनचा तलाव धोत्रे बु.।। ता.पारनेर येथे नेला.नंदाच्या मृत्युची खबर लागु नये म्हणून पोपट याने तिच्या पोटाला दगड बांधुन तलावाच्या पाण्यात खोल फेकला.
दि.३ एप्रिल रोजी एक  शेतकरी तलावाजवळ गेला असता असता तलावामधे महीलेचा मृतदेह तरंगत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले.सदरची घटना पोलिसांना समजताच पोलीसांनी घटना स्थळी धाव घेतली.मृतदेह कुजलेल्या अवस्थेमधे होता. पोलीसांनी नागरीकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला व त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. याचवेळी ढवळपुरी येथील चौधरीवाडीमधील महीला काही दिवसांपासुन बेपत्ता असल्याची मिसींग असल्याचे समजले. मयताचे नातेवाईकांनी मृत महीला नंदा पोपट जाधव हिच असल्याचे सांगीतले.अगोदर पोपट याने पत्नी बेपत्ता असल्याचा बनाव केला होता.मृत नंदाचा भाऊ सुरेश सिताराम केदार यांचे फिर्यादीवरुन पारनेर पोलुसस्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.नंदा हिचा मृतदेह सापडल्यानंतर पोपट याचा शोध घेतला असता तो घरी आढळून आला नाही. पोलिसांनी त्याचा खुप शोध घेतला.शेवटी गोपणीय माहीतीच्या आधारे नंदा व पोपटमधे भांडण झाल्यापासुन ते दोघेही त्या दिवसापासुन घरी नसल्याचे समजले.त्यानंतर पारनेर पोलिसांंनी पोपट यास डिग्रस येथुन ताब्यात घेतले. तोपर्यंत पत्नीचा मृतदेह आढळून आल्याची माहीती पोपटला नव्हती.
पोलिसांनी त्याला आधी विश्वासात घेतले तरी तो काहीही माहीती देण्यास तयार नव्हता. त्यानंतर पोलीसांनी त्याला घटनास्थळावर नेले.तेथून परत पारनेर येथे आणण्यात आल्या नंतर त्यास पोलीसी खाक्या दाखविल्यावर.त्याच्या बोलण्यात विसंगती येऊ लागली.मात्र पोलीसी खाक्यासमोर त्याचा निभाव लागला नाही.त्यानंतर मात्र त्याने चारीत्र्याच्या संशयावरुन नंदा हिचा खुन केल्याची कबुली दिली.
पारनेर पोलीस स्टेशनला आरोपी पोपट मारुती जाधव मुळचा राहणार ठाकरवाडी,ता.राहुरी सध्या राहणार ढवळपुरी याच्या विरोधा मधे भादवी कलम क्र.३०२,२०१ नुसार गुन्हा दाखल केला आहे.सदर कामगीरी पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप,स.पो. नि.प्रमोद वाघ,नाईक सुधीर खाडे,काँन्स्टेबल सत्यजित शिंदे,सुरज कदम,सतिष बर्डे,श्रीनाथ गवळी,भालचंद्र दिवटे,अजिंक्य साठे यांचे पथकाने केली असुन,पुढील तपास पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप हे करत आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here