एम आय.डीसी येथे दोघा मजुरांचा पेपरमिलच्या हौदात बुडून मृत्यू!

1

Rashtra Sahyadri Breaking News…

टिळकनगर- तालुक्यातील एम आय.डीसी
धनगरवाडी परिसरातील माऊली पेपर मिल कारखान्यातील कागदी लगदा बनविणाऱ्या मिक्सर
हाऊद मध्ये दोघा मजुरांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.


परशुराम विरेश भुताळे वय (16) राहणार जवाहरवाडी व नंदकाउ सिंग दयाशंकर वय (34) यूपी अशी दुर्घटनेत मृत झालेल्यांची नावे आहेत. मृत परशुराम भुताळे याची आई शेतमजूर असून त्याच्या मुलासोबत त्याच कारखान्यात वास्तव्यास असून, मुलगा परशुराम या पेपर मिल मध्ये कामाला होता, आई शेतांतुन कारखान्यातील राहत असलेल्या ठिकाणी संध्याकाळी परतली असता मुलगा परशुराम दिसत नसल्याने आईने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केले, संध्याकाळच्या सुमारास पेपरमिलच्या कारखान्यातील कागदी लगदा बनविणाऱ्या मिक्सर
हाऊद मध्ये परशुराम सह नंदकाउ सिंग या दोघांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून, लगेचच या दोघांना श्रीरामपूर येथील कामगार रुग्णालयात हलविण्यात आले मात्र डॉक्टरांनी दोघांची तपासणी केली असता दोघांना मृत घोषित केले.

घडलेल्या घटनेने परिसरात विविध चर्चेला उधाण आले असून काहींनी घातपातीचा संशय व्यक्त केला आहे. तर परशुराम विरेश भुताळे हा अल्पवयीन असल्याने कारखाना प्रशासन या अल्पवयीन मुलाच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here