सलग दुसऱ्या वर्षी विविध उत्सवांवर निर्बंध

0

घारगाव :-

सलग दुसऱ्या वर्षी काेराेना महामारीमुळे गुढीपाडव्यासह विविध उत्सव साजरे करताना कोरोनाचे नियम पाळावे लागणार आहेत. कारण १३ एप्रिल रोजी गुढीपाडवा, १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, पवित्र रमजान महिना आहे. २१ एप्रिलला रामनवमी, तर २७ एप्रिलला हनुमान जयंती आहे. गुढीपाडवा हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा सण म्हणून साजरा केला जातो.

 

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस सर्व प्रकारचे वैभव घेऊन आलेला आहे. हिंदू धर्म पंचांगाप्रमाणे नवीन वर्षाची गुढीपाडव्याच्या सुरुवात होते. त्याचबरोबर, वसंत ऋतूची सुरूवात याच दिवशी होत असते. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर या सहा ऋतूंपैकी वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा म्हणतात. इंग्रजी महिन्याप्रमाणे जसे एक जानेवारीला कॅलेंडर बदलतात, तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू धर्मातील नवीन वर्षाला सुरुवात होते. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे.

 

 

या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. मात्र, या वर्षी कोराेनाच्या धास्तीमुळे ३० एप्रिल रोजी पर्यंत दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असल्यामुळे खरेदीवर कोरानाच्या भीतीने सावट निर्माण झाले आहे. १३ एप्रिल रोजी गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे.

 

मात्र या वर्षी नवीन वर्षाची सुरुवातील कोरोनाची दुसरी लाट अतिवेगवान झाल्यामुळे कोरानाची भीती घराघरात निर्माण झाली आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या सनावर कोराेनाच्या दुसऱ्या लाटेचे सावट निर्माण झाले आहे. यंदा येणाऱ्या उत्सवाचा आनंद घेताना तेलही तितकेच महागले आहे. तसेच शेंगा आणि डाळी यांच्या किमतीतही भरमसाट वाढ झालेली आहे.

गुढीपाडव्यावर कोरोनाचे सावट

गुढीपाडव्याला साखराच्या हारांचे विशेष महत्त्व आहे. मात्र कोरोना मुळे हे साखरेचा हार विक्री करत येत नसल्यामुळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे सध्या फक्त कोराना मुळे किराणा दुकान चालू आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे मराठी नवीन वर्षाची सुरुवात कोरोनाच्या सावटाखाली होत असली तरी नियम पाळून कोरोनाला हद्दपार करण्याचा निश्चय करण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here