मुळा पात्रातून वाळूचा उपसा वाढला ; जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे कारवाईची मागणी….

0

घारगाव :

करोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने जनसामान्यांवर कठोर निर्बंध लादले असताना संगमनेर तालुक्यातील पठार भागातून जाणाऱ्या मुळा नदी पात्रातून दररोज खुलेआम हजारो ब्रास वाळूचा उपसा होत आहे. याबात जांबूत ग्रामस्थांनी विरोध केला असून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना ग्रांमपंचायत कार्यालयाकडून खैरदरा परिसरातून होणाऱ्या बेकायदा वाळू वाहतुकीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, जांबूत बुद्रुक व जांबूत खुर्द येथील ग्रामस्थांनी जांबूत ग्रामपंचायत कार्यालयाकडे बेकायदा वाळू वाहतुकीची वेळोवेळी तक्रार केली आहे. जांबूत बुद्रुक व जांबूत खुर्द गावाशेजारी असलेल्या खैरदरा परिसरातून मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू वाहतूक आमच्या गावातून केली जाते. नेकतेचं आमच्या गावातून जाणाऱ्या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत काम पूर्ण झाले आहे.

 

 

 

त्यानंतर रस्त्याने मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू वाहतूक झाल्यास रस्त्याची दुरावस्था होऊ शकते. आम्ही वारंवार तहसील कार्यालय संगमनेर यांच्याशी याबाबत पत्रव्यवहार केला आहे. परंतु अद्याप कोणतीही करावी झाली नाही. आजही राजरोस वाळू वाहतूक सुरु आहे. आमच्या ग्रामस्थांनी अडचण समजून घेत बेकायदा वाळू वाहतुकीवर कारवाई करावी असे म्हटले आहे. निवेदनावर सरपंच उत्तम पंढरीनाथ बुरके यांची सही असून जिल्हाधिकारी कार्यालयातील अवाक-जावक विभागाचा शिक्का आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here