जांबूत ग्रामस्थांचा खैरदरा परिसरातून होणाऱ्या बेकायदा वाळू वाहतुकीला विरोध….

0

घारगाव :

करोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने जनसामान्यांवर कठोर निर्बंध लादले असताना संगमनेर तालुक्यातील पठार भागातून जाणाऱ्या मुळा नदी पात्रातून दररोज खुलेआम हजारो ब्रास वाळूचा उपसा होत आहे. याबात जांबूत ग्रामस्थांनी विरोध केला असून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना ग्रांमपंचायत कार्यालयाकडून खैरदरा परिसरातून होणाऱ्या बेकायदा वाळू वाहतुकीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, जांबूत बुद्रुक व जांबूत खुर्द येथील ग्रामस्थांनी जांबूत ग्रामपंचायत कार्यालयाकडे बेकायदा वाळू वाहतुकीची वेळोवेळी तक्रार केली आहे. जांबूत बुद्रुक व जांबूत खुर्द गावाशेजारी असलेल्या खैरदरा परिसरातून मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू वाहतूक आमच्या गावातून केली जाते. नेकतेचं आमच्या गावातून जाणाऱ्या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत काम पूर्ण झाले आहे

लाखो रूपये खर्चुन गावातील रस्ते

मुळा नदी पात्रातून वाळू उपसा करण्यास नजीकच्या ग्रामस्थांनी कायमच कडाडून विरोध केला आहे. लाखो रूपये खर्चुन गावातील रस्ते केले जातात. मात्र वाळू वाहतुकीमुळे या रस्त्यांची दुरावस्था होते. यानंतर पुन्हा रस्ते करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींची दमछाक होते.

जांबुत चौफुली, एकोणीस मैल तस्करांचे मुख्य केंद्र

वाळू तस्करीकडे महसूलचे पूर्ण दुर्लक्ष असल्याने खुलेआम वाळू तस्करी रात्रंदिवस होत आहे. या वाळू तस्करांचे मुख्य केंद्र जांबुत चौफुली, एकोणीस मैल आहे. या ठिकाणांहून वाहतुकीचे नियोजन वाळू तस्कर काही महसूलच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून करत असल्याची बाब समोर येत आहे.

वाळू वाहतूक शोध पथक; कारवाई शून्य

संगमनेर तालुक्यात वाळू वाहतूक शोध पथक २४ तास कार्यरत असतानाही दिवसरात्र चालू असलेला वाळू उपसा व वाहतूक या पथकाला दिसत नाही. पथकामध्ये रोज एका सर्कलमधील सर्कल, तलाठी, कोतवाल सहभागी असतात. मात्र या पथकाचा लगाम वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हाती असल्याने पथक केवळ पाहण्याची भूमिका पार पाडत आले आहे.

मुळाच्या वाळूला पुणे जिल्ह्यात मागणी

मुळा नदी पात्रातील वाळूला पुणे जिल्ह्यात मोठी मागणी आहे. राज्य शासनाने जनसामान्यांवर कठोर निर्बंध लादले असतानाही ७० ते ८० हायवा, ट्रकच्या साह्याने रात्रदिवस वाळू वाहतूक सुरु आहे. महसुलाला याची माहिती होत नाही हे विधान जरा धाडसाचे ठरेल. येथील मार्ग थेट महसूलच्या दारावरून जात असल्याने इतर विभागयाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here