गोणेगाव चौफुला येथील रामकृष्ण आश्रमासाठी दात्यांकडुन वॉटर फिल्टर व फ्रीज भेट

0
नेवासा :
नेवासा तालुक्यातील गोणेगाव चौफुला येथील श्री विठ्ठल रुख्मिनी मंदिर रामकृष्ण आश्रमासाठी भक्त परीवारातील दानशूर दात्यांकडुन वॉटर फिल्टर मशीनसह  फ्रीज भेट देण्यात आला आहे अशी माहिती आश्रमाचे प्रमुख हभप भगवान महाराज जंगले शास्त्री यांनी दिली.
 रामकृष्ण आश्रमाचे भक्त परीवारातील संतसेवक कै.गेणाभाऊ यशवंत देवखिळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ  रमेश भाऊ देवखिळे  अहमदनगर यांनी सुमारे ३८ हजार रुपये किंमतीचे वॉटर फिल्टर मशीन भक्तांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून भेट दिले आहे तर आश्रमातील  सेवेकरी  श्रीमती विमलताई लांडे व श्रीमती सुमनताई गायके,सुरेखाताई आदिक यांच्या कडून सुमारे १९ हजार रुपये किमतीचे गोदरेज रेफ्रिजरेटर भेट देण्यात आले.स्वामी अभेदानंदजी महाराज यांच्या हस्ते व भगवान महाराज जंगले शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी वस्तूंचे पूजन करण्यात आले.
कोरोनाच्या महामारीमुळे रामकृष्ण आश्रमातील  धार्मिक कार्यक्रम हे शासन नियमांचे पालन करत  छोटेखानी पद्धतीने सुरू असून गुरुवर्य वैकुंठवाशी काळे गुरुजी यांनी घालून दिलेल्या परंपरे नुसार आश्रमाची धुरा वात्सल्यमूर्ती हभप भगवान महाराज जंगले शास्त्री हे सांभाळत असून वारकरी परंपरेतील धार्मिक शिक्षण ते विद्यार्थ्यांना देतात.
 रामकृष्ण आश्रमासाठी दानी वृत्तीने वॉटर फिल्टर मशीन व रेफ्रिजरेटर भेट दिल्याबद्दल आश्रमाच्या वतीने रमेश देवखिळे व श्रीमती विमलताई लांडे व सुमनताई गायके,सुरेखाताई आदिक यांचे भक्त परिवारातून अभिनंदनाद्वारे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here