शिवरायांच्या रायरेश्वर पठारावर आढळली सात रंगांची माती    

0
पहा महाराष्ट्रातील अदभूत सप्तरंग मातीचा किल्ला .मातीतमधून उलघडले सप्तरंगाचे अंतरंग
 अंतरंग जमिनीवरच्या निसर्ग रंगाचा खेळ शिवरायांच्या रायरेश्वर पठारावर आढळली सात रंगांची माती    

धर्म अर्थ  शास्त्र इतिहास आणि संस्कृतीने नटलेल्या शिवपराक्रमाचा आणि संतांचा भूमी म्हणून ओळखल्या जाणार्या महाराष्ट्र राज्याला जशी  ज्ञान विज्ञानाची जोड मिळाली आहे तसा गडकिल्ल्यांचा इतिहासिक वारसा लाभलेला असून या महाराष्ट्राच्या ऐतिहासिक किल्ल्याची माती पाण्यात जरी टाकली तरी त्यावर येणाऱ्या तवंगाला ही इतिहासाचा सुगंध येतो.

याची प्रचीती नुकतीच छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा शिलेदार असलेल्या किल्ले रायरेश्वरच्या पठारावर आली आहे. चक्क येथील पठारावर निसर्गाचा अदभूत साक्षात्कार घडला असून सात रंग असलेल्या मातीचा अनमोल ठेवा पाह्यला मिळाला आहे. जणू काही आकशातील इंद्रधनुष्य जमिनीवर अवतरल्या सारखे वाटत आहे.

 

हजार फूट उंच आणि 16 किलोमीटर लांब असलेल्या या पठारावर नैसगिर्क सात रंगाची माती एकाच ठिकाणी पाहायला मिळत आहे ही निसर्ग किमया आणि भोगोलिक घटनांचा साक्षात्कार शिवस्पर्श पठारावर घडला आहे.  याचा ठिकाणावर विशिष्ट कालावधीत निसर्ग निर्मित फुलांची जशी किमया घडत असते तशीच काहीशी विज्ञान भोगोलिक बदलातील जादू ही या सात रंगाच्या मातीत पहावयास मिळत आहे या मातींविषय पुणे विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागाने केलेल्या परीक्षणात या सात रंगाची माती ही एकाच खडकापासून तयार झाली आहे.

वातावरण पाऊस यांमुळे त्या जमिनीवर अनेक वर्षांपासून बदल होत गेला आहे. प्रामुख्याने लैटेराइट हा खडक याठिकाणी पाहिला मिळतो आणि त्यात इतर सफेदपिवळाजांभळाकाळालालाराखाडीहिरवा असे रंग असल्याने त्या परिसरात या रंगाची माती आता निदर्शनास येत आहे.

खरतर असे मत भूगर्भशास्त्र तज्ञांनी व्यक्त केला आहे रायरेश्वर शिवमंदिर याच परिसरात जंगम लोकांची मोजकी वस्ती आहे. वस्तीच्या मागील म्हणजे पश्चिमेला झाडाझूडपातून वाट काढत किलोमीटर वर हा निसर्गाचा अनमोल अद्भुत ठेवा नजरेस पडतो .

.. प्रत्येक मातीचा ढीग हा वेगळ्या रंगांचा पाहायला मिळतो काहीही असो आजच्या धावत्या जगात आणि आधुनिक युगात हरवलेल्या मानवाला या ऐतिहासिक पठारावरील मातीच्या सप्तरंगाचा स्वर्ग असतो आणि तो अनुभवता ही येऊ शकतो हा काही कमी चमत्कार नाही असे म्हणावे लागेल.   

विजयकुमार हरिश्चंद्रे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here