दातीर कुटुंबियांना न्याय मिळवून देऊ

0

त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहु- अखिल भारतीय पुरोगामी प्रसार माध्यमे पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष व दै. राष्ट्र सह्याद्रीचे प्रतिनिधी सहदेव जाधव यांचे आश्वासन

साकूर :

६ एप्रिल रोजी राहुरीत पत्रकार रोहिदास दातीर यांचे भर दिवसा भर चौकातून अपहरण करून हत्या झाली होती. यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केली आहे. पंरतु दातीर यांनी वारंवार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुनही पोलिसांनी हलगर्जीपणा केला त्यामुळे दातीर यांना जीव गमवावा लागला आहे.

‘पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्या झाल्यावर आखिल भारतीय पुरोगामी प्रसार माध्यम पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व दै. राष्ट्रसह्याद्रीचे प्रतिनिधी सहदेव जाधव यांनी दातीर कुटुंबाची सांत्वनभेट घेउन त्यांना किराणा माल देऊन आम्ही दातीर कुटुंबाला न्याय मिळवून देऊ,खंबीरपणे उभे राहु असे अश्वासन देऊन धीर दिला आहे. यात दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे त्याबद्दल पोलीस निरीक्षक व उपाधिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.

सविस्तर माहिती अशी समोर येत आहे की, राहुरीतील १८ एकर भूखंडाच्या मालकीसंबंधी दातीर यांनी सतत आवाज उठवला होता त्यामुळे मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या अडचणी वाढत असल्याने त्यांनी ही हत्या केली. या भूखंडाची माहिती मिळविली तेव्हा कळले की हा भूखंड पठारे नावाच्या एका शेतकऱ्याच्या नावावर आहे. मात्र नगरपालिकेने तेथे आरक्षण टाकले होते.

नंतर अचानक हे आरक्षण उठविण्यात आले. त्या जागेत आता सोहम ट्रान्सपोर्ट कंपनी आहे. आम्ही माहिती घेतली की ही कंपनी कोणाची आहे. तर असे आढळून आले की राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावे ही कंपनी असून सोहम त्यांच्या मुलाचे नाव आहे. *या कंपनीत तनपुरे यांचे मेहुणे देशमुख आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू मोरे हे भागिदार आहेत.

दातीर यांना पठारे कुटुंबियांनी मुखत्यारपत्र दिले होते. त्या आधारे दातीर या भूखंडासाठी कायदेशीर लढाई लढत होते. यावरून त्यांना मोरे यांच्याकडून अनेकदा धमक्या आल्या होत्या. दातीर यांच्या पत्नीने पोलिसांत तशी तक्रारही दिली होती. मोरे याच्या विरुद्ध दातीर यांनीही अनेकदा तक्रारी केल्या होत्या.

मात्र, पोलिसांनी कारवाई केली नाही. दातीर यांना संरक्षणही दिले नाही, येथील पोलीस मंत्र्यांच्या दबावाखाली काम करतात हे देखील सिद्ध झाले आहे, दातीर यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना अटक करण्यात यावी आणि दातीर यांच्या कुटुंबाला पत्नी,मुले,भाऊ,आई यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी विनंती सहदेव जाधव यांनी पोलीस उपाधिक्षक राहुल मदने यांच्या कडे केली आहे.


दातीर कुटुंब सध्या भयभीत अवस्थेत आहे, मंत्र्यांच्या दहशतीमुळे या कुटुंबाकडे कोणीही फिरकत नाही, अपहरण झालेल्या ठिकाणी चाळीस ते पन्नास लोक उपस्थित होते, दातीर यांना गाडीत बळजबरीने बसवताना ते आरडाओरडा करत होते परंतु कोणीही त्यांच्या मदतीला धावून आले नाही हि मोठी शोकांतिका आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारीतेची हत्या होते हे अत्यंत निंदनीय आणि दयनीय आहे.
यावेळी पत्रकार रमजान शेख, पत्रकार नवनाथ वावरे,पत्रकार कोंडाजी कडनर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here