पंचगंगा सिड्स उद्योग समूहाच्या वतीने भेंडा कोविड सेंटरला देणगीच्या रूपाने शंभर बेडची भेट

0
नेवासा :
कोरोनाचे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने कोविड केअर सेंटर मधील सुविधेवर मर्यादा येत आहे.बेड,गॅस डिलेंडर, मास्क,सॅनिटायझर या सारख्या वस्तूंची गरज भासत असल्याने शासकीय कोविड केअर सेंटर मधील पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी केले.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्रीसंत नागेबाबा भक्तनिवासामध्ये सुरू असलेल्या शासकीय कोविड केअर सेंटर करिता पंचगंगा सिड्सने १०० बेडसची देणगी दिली. पंचगंगा सिड्सचे प्रमुख बाळासाहेब शिंदे व प्रभाकर शिंदे यांनी बंधूंनी केलेल्या सूचनेनुसार त्यांचे बंधू संचालक काकासाहेब उत्तमराव शिंदे यांनी भेंडा येथे तहसीलदार श्री.सुराणा यांचे कडे १०० बेड्स सुपूर्द केले.
यावेळी बोलताना तहसीलदार सुराणा म्हणाले की, भेंडा कोविड केअर सेंटर मध्ये आज अखेर १६२ रुग्ण उपचार घेत आहेत. काही रुग्णांना कॉट-गादी(बेड) शिल्लक नव्हते ही अडचण ओळखून उद्योजक प्रभाकर शिंदे यांनी १०० बेड्स दिले आहेत.त्यामुळे येथील एकूण बेड संख्या २५० झाली आहे.अजून २५० बेड्सची तसेच गॅस सिलेंडर,मास्क, सॅनिटायझरची सुद्धा आवश्यकता आहे.नेवासा तालुक्यात रुग्णवाहिका ही कमी पडत आहेत.कोणी प्रायोजक असेल ते दोन रुग्णवाहिकांची मदत करावी.रोख रक्कम न देता दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन वस्तू रूपाने मदत करावी असे आवाहन ही तहसीलदार सुराणा यांनी केले आहे.
यावेळी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी, कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.भाग्यश्री-सारूक-कीर्तने,डॉ.योगेश साळुंके,बाजार समितीचे सभापती डॉ. शिवाजी शिंदे,डॉ.कोलते,किशोर मिसाळ,सुभाष महाशिकारे, राजेंद्र चिंधे,नंदू गव्हाणे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here