लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखाना कामगारांना आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप

5

भेंडा :

येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या हस्ते व संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत सर्व कामगारांना आर्सेनिक अल्बम 30 या कोरोना प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या गोळ्यांचे  वाटप करण्यात आले.

कामगार संचालक सुखदेव फुलारी प्रस्ताविक करतांना म्हणाले, कोरोना विषाणू आजाराचे अनुषंगाने कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील,संचालक  माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील व संचालक मंडळाचे मार्गर्दशनाखाली व्यवस्थापनाकडून कामगारांच्या आरोग्याची पुरे पुरे काळजी घेतली जात आहे.सर्व कामगारांचे दररोज थर्मल स्कॅनिंग व सॅनिटायझरचा व मास्कचा वापर केला जात.

 

जून 2020 मध्ये ही 850 कामगारांना आर्सेनिक अल्बम 30 चे वाटप केले होते.कोरोनाची आता पुन्हा दुसरी लाट आल्याने खबरदारी म्हणून कारखाना व्यवस्थापन,कामगार संघटना व सांस्कृतिक मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने सध्या कामावर हजर असलेल्या सर्व 1248 कामगारांना (कुटुंबातील 4 व्यक्तींसाठी फॅमिली पॅक) कोरोना प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या  आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप  करण्यात येत आहे.

डॉ.सुभाष भागवत यांनी आर्सेनिक अल्बम या औषधांचे फायदे व ते घेण्याची पद्धत-पथ्य यावर मार्गदर्शन केले.

यावेळी ए.बी.खरड, वर्क्स मॅनेजर एस.डी.चौधरी,मुख्य शेतकी अधिकारी सुरेश आहेर,डिस्टिलरी इंचार्ज महेंद्र पवार,कल्याण म्हस्के,के.एन. गायके,जनसंपर्क अधिकारी कल्याण म्हस्के,कामगार कल्याण अधिकारी बाळासाहेब डोहाळे,कामगार संघटनेचे  सहखजिनदार संभाजी माळवदे,सांस्कृतिक मंडळाचे सचिव श्रीकृष्ण उगले,खजिनदार कारभारी गरड,अण्णासाहेब गर्जे,आप्पासाहेब बोडखे आदी उपस्थित होते.

5 COMMENTS

 1. Definitely consider that that you said. Your favourite justification appeared
  to be at the web the simplest factor to take into
  account of. I say to you, I definitely get annoyed whilst people consider issues that they just don’t recognise about.
  You controlled to hit the nail upon the top and outlined out the entire thing without having side effect ,
  folks could take a signal. Will likely be again to get more.
  Thank you

  Feel free to visit my site :: buy cbd

 2. These are genuinely great ideas in concerning blogging.
  You have touched some fastidious points here. Any way
  keep up wrinting.

  Look at my web blog – cbd

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here