आधी कोरोना त्यात कडक उन्हाळ्यामुळे पुणतांबेकर त्रस्त

0

पुणतांबा  :

पुणतांबा परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे विकेन्ड लॉकडाऊन सुरु आहे जागरूक ग्रामस्थांनी ह्या लॉक डाऊनला सकारात्मक प्रतिसाद दिलेला असला तरी राज्य सरकार आठ दिवसाचा कडक लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता असल्यामुळे ग्रामस्था मध्ये चलबिचल निर्माण झाली आहे कारण ह्या सकटांचा सामना करावाच लागणार आहे.

 

कोरोना बरोबर गेल्या तीन दिवसापासून परिसरात कडक उन्हाळा सुरु झाल्यामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच महावितरण मार्फत वीजेचा लंपडाव सुरुच असल्यामुळे शेतकरी ग्रामस्थ विद्यार्थी वर्ग हैराण झाले आहेत. महावितरणकडे अपुरा कर्मचारी वर्ग आहे, त्यातच मुख्य व सलंग्न वाहिन्या जुनाट झालेल्या आहेत त्यामुळे सातत्याने पुणतांबा परिसरातील कुठे तरी तांत्रिक बिघाड होतोच, त्याच निघोज वरून येणाऱ्या मुख्य लाईन वर बिघाड झाला तरी पुणतांबेकरांचा विद्युत पुरवठा खंडित होतो.

 

 

त्यात अधिकारी वर्गाचा फारसा दोष नसतो त्यातच परिसरातील विद्युत लाईनवर लाईट ट्रीप होण्याचे प्रमाण वाढले आहे. उन्हाळ्यात महावितरण मार्फत दुरस्ती व देखभालीची कामे प्राधान्याने हाती घेतली तर वीज प्रवाह खंडित होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते मात्र पुरेसे मनुष्य बळ नसतांनाही येथील अधिकारी थकित वसुली बरोबर च विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.

 

डेरा नाला भागातील प्राचार्य डॉ बखळे यांच्या शेतासमोर असलेली डी.पी १५ दिवसापासून बंद आहे डीपी वर कनेक्शन असणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांनी बिले भरलेली असतांना त्यांना विजेअभावी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती समजावून सागितल्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनाचा गाजावाजा न करता काही दिवस वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे.

 

त्यातच गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या साठवणुकीच्या तलावातील पाणी संपल्याचे ग्राम पंचायत प्रशासनाने जाहिर केल्यामुळे पुणतांबा गावचा पाणी पुरवठा काहीसा विस्कळीत होण्याची शक्यता आहे कोरानाचा संसर्ग कडक उन्हाळा त्यातच विजेचा लंपडाव यामुळे पुणतांबा परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून ग्रामस्थ त्रस्त झाल्याचे दिसून येत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here