छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी शासकीय सलामीने साजरी

0

कोरोनाच्या सावटामुळे तुळापूरात छत्रपती संभाजी महाराज
पुण्यतिथी प्रातिनिधिक स्वरूपात शासकीय सलामीने साजरी

वाघोली :

श्रीक्षेत्र तुळापूर (ता. हवेली) येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३२ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम कोरोनाच्या सावटामुळे प्रातिनिधिक स्वरूपात शासकीय सलामी देवून साजरा करण्यात आला. तर बलिदान मासानिमित्त अनेक शंभूभक्तांनी रक्तदानही केले.


या वर्षीही कोरोनाच्या वाढत्या सावटामुळे तुळापूर येथील पुण्यतिथीचे दरवर्षीचे कार्यक्रम प्रशासनाच्या सुचनेनुसार ग्रामपचांयतीने रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कोविडचे नियम पाळुन केवळ प्रातिनिधीक कार्यक्रम म्हणुन आमदार ॲड. अशोक पवार यांच्या हस्ते शंभुराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला व येरवडा विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त किशोर जाधव यांच्या हस्ते समाधिस्थळी शासकीय पुजा करण्यात आली. यावेळी पुणे शहर पोलीस दलाच्या वतीने मानवंदनाही देण्यात आली. पुण्यतिथीनिमित्त समाधि स्थळी फुलांची सजावट करण्यात आली होती.

या प्रसंगी उपस्थित मान्यवर तहसिलदार विजयकुमार चोबे, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, पोलिस निरीक्षक प्रताप मानकर आदींचे सरपंच ॲड. गुंफा ज्ञानेश्वर इंगळे, उपसरपंच पवन खैरे व ग्रामविकास अधिकारी रतन दवणे यांनी स्वागत केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणीकंद पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. शंभुभक्त व ग्रामस्थांनी घरुनच अभिवादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here