Exam: दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या….!

4

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

मुंबई: राज्य सरकार लोकांची तयारी करत असताना शालेय शिक्षण विभागाने देखील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज ही घोषणा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, पुढच्या प्रवेशाला त्यांना अडचणी येऊ नये, याचा विचार निर्णय घेताना करण्यात आला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बारावीची परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल तर दहावीची परीक्षा जून महिन्यामध्ये होणार आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संभ्रम आता दूर झाला आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना यंदा कोरोनाच्या निमित्ताने का होईना अभ्यासासाठी आगाऊ वेळ मिळाला आहे.

4 COMMENTS

  1. I?¦ll right away take hold of your rss as I can’t in finding your email subscription link or e-newsletter service. Do you have any? Kindly permit me recognise so that I may just subscribe. Thanks.

  2. It’s a shame you don’t have a donate button! I’d most certainly donate to this excellent blog! I suppose for now i’ll settle for book-marking and adding your RSS feed to my Google account. I look forward to brand new updates and will talk about this blog with my Facebook group. Talk soon!

  3. naturally like your website however you need to test the spelling on quite a few of your posts. Many of them are rife with spelling problems and I find it very troublesome to tell the reality however I’ll certainly come again again.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here