कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे – महसूल मंत्री नामदार थोरात यांची प्रार्थना

0

संगमनेर :

मागील वर्षापासून देशासह जगावर आलेले कोरोना संकट हे माणसावरील आहे. त्यामुळे मागील वर्ष पूर्ण कोरोनामध्ये गेले असून माणसाची जीवन पद्धती अडखळली आहे. अर्थव्यवस्थाही थांबली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समृद्धीचे दिवस येण्याकरिता कोरोना हे संकट लवकरात लवकर दूर होऊन चांगले दिवस व समृद्धी यावी अशी प्रार्थना महाराष्ट्राचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

 

 

मुंबई येथील रॉयल स्टोन या शासकीय निवासस्थानी नामदार बाळासाहेब थोरात व सौ कांचनताई थोरात यांनी विधिवत पूजा करून कोरोनाच्या नियमांसह आरोग्याची गुढी उभारली.

 

या वेळी शुभेच्छा देताना महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, मागील वर्षी आलेल्या कोरोनामुळे 2020 हे वर्षे अत्यंत अडचणीचे गेले. कोरोना हा काहीसा कमी होतो आहे असे वाटत असतानाच पुन्हा दुसरी लाट आली. या लाटेमध्ये रुग्ण संख्या वाढली आहे. ही बाब चिंताजनक आहे. मात्र तरीही प्रशासन अतिशय चांगले काम करत असून कोरोनाची लाट लवकरात लवकर आटोक्यात आणून कोरणा मुक्त महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडी सरकार काम करत आहे. यामध्ये नागरिकांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. शासनाचे नियम पालनासह प्रत्येकाने स्वयंशिस्त ही बाळगावी कारण जीवन आहे तर सर्व काही आहे.

 

 

महाविकास आघाडी सरकारने मागील दीड वर्षांमध्ये अत्यंत चांगले काम केले असून रायातील सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्याच्या विकासाकरता काम केले आहे. राजकारण हे सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी असते. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या विकासासाठी सातत्याने काम होत राहील असा विश्वास व्यक्त करताना कोरोना च्या पार्श्वभूमीवर नाईलाजास्तव लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागणार आहे. तो मुख्यमंत्री लवकरच जाहीर करणार असून दररोज सुमारे पन्नास हजाराच्या पुढची वाढणारी रुग्ण संख्या अत्यंत चिंताजनक आहे. म्हणून लॉकडाऊन चा निर्णय घ्यावा लागणार आहे यालाही जनतेने सहकार्य करावे असे आवाहन नामदार थोरात यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here