जिल्हा परिषद काँग्रेस गटनेते अजय फटांगरे यांची बोटा कोविड सेंटरला भेट…

0

घारगाव :-

जिल्हा परिषद काँग्रेस गटनेते व बोटा जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांनी मंगळवारी (१३ एप्रिल) पठारभागात वाढत्या कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर बोटा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील कोविड केअर (सीसीसी) सेंटरला भेट दिली. यावेळी रुग्णांची भेट घेऊन व्यवस्थेबद्दल विचारपूर केली.

 

 

जिल्हा परिषद बोटा गटात कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याबद्दल जिल्हा परिषद काँग्रेस गटनेते अजय फटांगरे यांनी चिंता व्यक्त केली. यावेळी रुग्णांनाकडून व्यवस्थेबद्दल विचारपूर करत आरोग्य विभागाकडून येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या.

 

बोटा जिल्हा परिषद शाळेतील कोविड सेंटरमध्ये विलगीकरणात असलेल्या रुग्णांसाठी मदतीचे सोशल मीडियावर आवाहन करण्यात आले होते. याला अनेकांनी प्रतिसाद दिला असून सोमवारी दहा गाद्या, शंभर बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचे बॉक्स कोविड सेंटरला उपलबब्ध झाले होते. मंगळवारी फटांगरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी जिल्हा अल्पसंख्याक विभाग उपाध्यक्ष मुनीरभाई शेख यांनी स्वखर्चातून रुग्णांना १० वाफ घेण्याचे मशीन, २०० मास्क, सैनिटाइजर १० लिटर, सैनिटाइजर २५ बाटल्या, आरोग्य सेविकांसाठी ३ फेसशिल्ड, 200 हॅन्ड ग्लोज वाटप केले.

यावेळी बोटा गण पंचायत समिती सदस्य संतोष शेळके, बोटा ग्रामपंचायत माजी आदर्श सरपंच विकास शेळके, बोटा ग्रामपंचात उपसरपंच संतोष शेळके, जयहिंद युवा मंचचे बोटा गट प्रमुख सुहास वाळुंज, अकलापूर सरपंच अरुण वाघ, प्राचार्य महेंद्र जटार, शिक्षक रमेश आहेर, राष्ट्रवादी जिल्हा अल्पसंख्याक विभाग उपाध्यक्ष मुनीरभाई शेख, बोटा प्राथमिक आरोग्यकेंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. अतिश कापसे, कुरकुटवाडी उपसरपंच बाळासाहेब कुरकुटे, बाळासाहेब कुऱ्हाडे, राहुल कुरकुटे, निखिल कुरकुटे, अमित शेळके, सागर काटे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here