परदेशातील उच्च शिक्षण प्रवेशासाठी ‘इनफॉरन्स’ ची स्थापना

4

विद्यार्थ्यांना अचूक सल्ला ; ससेहोलपट आणि दिशाभूल थांबणार

श्रीरामपूर :


शिक्षण घेण्याची जिद्द आणि इच्छा तसेच प्रचंड बुद्धिमत्ता, भरपूर मार्क्स, असूनही केवळ चुकीच्या सल्ल्यामुळे भारतातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळत नाहीत. वेळेवर योग्य मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थ्यांना चांगल्या विद्यापीठात निश्चित प्रवेश मिळतो. जगातील अव्वल दर्जाच्या विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना सहजतेने प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थ्यानी विद्यार्थ्यांसाठी ‘ इनफॉरन्स स्टार्ट अप ‘ ची स्थापना केली असल्याची माहिती ‘इनफॉरन्स’ चे संस्थापक, क्वीन मेरी युनिव्हर्सिटी लंडनचे श्रीरामपूर येथील विद्यार्थी यश गुलाटी आणि वारविक युनिव्हर्सिटी युके ची पुणे येथील विद्यार्थिनी देविका घोषाल यांनी दिली.

http://www.inforens.com


यश गुलाटी आणि देविका घोषाल या दोन आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी ” इनफॉरन्स ” ची स्थापना केली आहे. परदेशातील उच्च विद्यापीठात विद्यार्थ्याना सुलभ प्रवेश मिळवून देणारी जगभरात ही पहिलीच अशी फोरम आहे. या संदर्भात विस्तृत आणि सविस्तर माहिती देताना गुलाटी व घोषाल म्हणाले की, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स यासह २५ वेगवेगळ्या देशांतील ३५ हून अधिक सर्वोत्तम अशा विद्यापीठांमधील विद्यार्थी या ” इनफॉरन्स ” चे सदस्य आहेत.


भारतासह जगभरातील विद्यार्थ्यांसाठी हा एक अनोखा उपक्रम आहे. अर्ज करण्याच्या प्रक्रियेची व्यावहारिकता विद्यार्थ्यांना समजणे अवघड असते. तेथील शैक्षणिक सल्लागाराकडून (एजंट) विद्यार्थ्यांना चुकीचा सल्ला दिला जातो. शिक्षण सल्ला हा अनेकांसाठी आज एक व्यवसाय बनला आहे. बहुसंख्य शैक्षणिक सल्लागार सल्ला देण्यास पात्र नसतात, तरीही ते सल्ला देतात आणि हीच सर्वात मोठी अडचण भारतातील परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असते, असे त्यांनी आवर्जून संगितले.

http://www.inforens.com


खाजगी शैक्षणिक सल्लागार हे सल्ला देणाच्या बदल्यात विद्यार्थ्यांकडून मोठी रक्कम आकारतात. केवळ शुल्क भरणारेच विद्यार्थी शैक्षणिक सल्लागारांपर्यंत पोहोचतात. मात्र जे विद्यार्थी हुशार आहेत, ज्यांच्या कडे प्रचंड बुद्धिमत्ता आणि विविध कौशल्ये आहेत पण शैक्षणिक शुल्क भरण्याची क्षमता आणि माहिती नाही. शिक्षणासाठी परदेशात जाण्याची तीव्र इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांना योग्य ठिकाणी प्रवेश मिळवून देत त्यांना ” इनफॉरन्स ” जास्तीत जास्त शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी काम करणार आहे, असे गुलाटी आणि घोषाल यांनी संगितले.


उच्चभ्रू विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सीव्ही, स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि अर्ज कसा व कुठे करावा याबाबतचा पूर्ण व योग्य सल्ला आम्ही देणार आहोत. जगातील विद्यापीठात शिक्षण घेऊ शकणार्यास संभाव्य विद्यार्थ्यांना चांगल्या विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळावा यासाठीच ” इनफॉरन्स स्टार्ट अप ” ची स्थापना करण्यात आली आहे.


परदेशात शिक्षण घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे स्वतंत्र असे एक व्यासपीठ तयार करणे हे आमचे उद्दीष्ट आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना प्रामाणिक आणि अचूक सल्ला मिळणार आहे. पाश्चात्य देशांमध्ये शिकणाऱ्या भारतातील विद्यार्थ्यांचा आलेख सातत्याने वर जात आहे. जगातील पहिल्या सर्वोत्तम १०० विद्यापीठात भारतातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालविलेल्या ” इनफॉरन्स ” कडून अचूक सल्ला आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

युनायटेड स्टेट्समध्ये दरवर्षी शिक्षण घेणारे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी अंदाजे १४ लाखाहून अधिक असून युनायटेड किंगडममध्ये ते ६ लाखाहून अधिक आहेत. त्यातील बहुसंख्य आंतरराष्ट्रीय विद्यार्थी हे भारत आणि चीनमधील असल्याचे त्यांनी संगितले. पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळवून देण्यासाठी या " इनफॉरन्स " च जन्म झाला असून भारतासह जगातील विद्यार्थ्यांनी आवश्यक त्या माहितीसाठी मोबाइल नंबर - ९१९५६१८८४८८३ , ४४७५८७०३९८५३ तसेच contact@inforens.com या ई- मेलवर संपर्क करावा, असे आवाहन करीत वेगवेगळ्या इतर आधिकच्या माहितीसाठी www.inforens.com या वेबसाइटला भेट द्यावी.

याद्वारे विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळावी, असा या " इनफॉरन्स " चा मुख्य उद्देश असल्याचे ते म्हणाले. केवळ विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळावा हा उद्देश नसून विद्यार्थ्यांची आवड, दृष्टी आणि भविष्यातील योजना त्यांना समजणे आणि समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. खाजगी शिक्षण सल्लागार एकाच महितीपत्रकात माहिती भरून घेऊन दर्जा नसलेल्या विद्यापीठात आपल्या भारतातील तसेच इतर देशातील विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. परदेशातील पद्धत समजून घेण्याच्या संघर्षातून या " इनफॉरन्स " ची स्थापना करण्यात आली आहे. आज अनेक शैक्षणिक सल्लागार व्यावसायिक आहेत.

या प्रक्रियेमध्ये प्रत्यक्षात ते कधीच गेलेले नाहीत. त्यांना अनुभव नसल्याने प्रवेश घेणार्याू विद्यार्थ्यांना ते केवळ जुजबी आणि साधारण सल्ले देतात. यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असून " इनफॉरन्स " एक दीपस्तंभ ठरेल, यासाठी आम्ही काम करणार असल्याचे यश गुलाटी आणि देविका घोषाल म्हणाले.

4 COMMENTS

  1. I do enjoy the manner in which you have framed this concern plus it really does offer me a lot of fodder for consideration. However, from just what I have personally seen, I simply just trust as the actual feedback pack on that people stay on issue and don’t start upon a tirade associated with some other news du jour. Still, thank you for this excellent piece and although I can not necessarily concur with this in totality, I respect your perspective.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here