माजीमंत्री क्षीरसागर यांचा फोन आणि 2800 रेमडेसिव्हर उपलब्ध

बीड :
बीड जिल्ह्यामध्ये रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे बेडची संख्या कमी पडू लागली असून रेमडीसीवीरचा तुटवडा आणि ऑक्सिजनचा तुटवडा आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी धावपळ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत असतानाच माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी थेट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी तात्काळ सम्पर्क साधून रेमडेसिव्हर उपलब्ध करून देण्याची विनंती केली.  त्यानुसार आता 2800 रेमडेसिव्हर उपलब्ध होत असून उद्या 1200 आणि परवा 1600 इंजेक्शन उपलब्ध होणार आहेत दोन दिवसांपूर्वीच 500 इंजेक्शन बीडला पोहच झाले होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. एकाच महिन्यात दस पट रुग्ण संख्या आढळत आहे. अशा परिस्थितीत जनतेला काळजी घेण्याबाबत आणि सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत माजीमंत्री आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आरोग्य अधिकारी यांच्या सातत्याने संपर्कात आहेत.
गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिव्हर इंजेक्शने शिल्लक नसल्याचे अनेकांनी फोन करून सांगितल्या मुळे दोन दिवसांपूर्वी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेऊन थेट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना संपर्क साधला तेव्हा तात्काळ 500 इंजेक्शन उपलब्ध करून दिली. काल शनिवारी देखील पुन्हा 5 हजार इंजेक्शने उपलब्ध करून देण्याची विनंती केली.  पुरवठ्यानुसार नक्कीच इंजेक्शन साठा उपलब्ध होईल काळजी करू नये सध्या तातडीने 2800 इंजेक्शन उपलब्ध करून देऊ असे म्हणून मंत्री टोपे यांनी इंजेक्शन पुरवण्याचे आदेश दिले.
त्यानुसार आजच 1200 इंजेक्शन उपलब्ध होत आहेत, तर उद्या पुन्हा 1600 इंजेक्शन मिळणार आहेत. बीड जिल्हयातील आणि मतदार संघातील जनतेने प्रशासनाचे नियम पाळून स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here