Agriculture : पिंपळवंडीत बिबट्याने पाडला कालवडीचा फडशा

विजय चाळक

आळेफाटा – प्रतिनिधी पिंपळवंडी येथील काकडपट्टा शिवारातील रमजान उस्मान पठाण यांच्या घराशेजारी असलेल्या गोठ्यात बिबट्याने प्रवेश करुन कालवडीचा फडशा पाडला ही घटना शनिवारी ( दि १७)  मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की जुन्नर तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे बिबट्यांकडून सातत्याने पाळीव प्राण्यांवर हल्ले होत आहेत. पिंपळवंडी काकडपट्टा शिवारात राहणारे रमजान उस्मान पठाण यांच्या गोठ्यात बिबट्याने प्रवेश करुन ठार केले पठाण हे पहाटे साडेपाच वाजता झोपेतून उठल्यानंतर गोठ्यात गेले असता त्यांना कालवडीचा बिबट्याने फडशा पाडला असल्याचे दिसून आले. याबाबत वनखात्याला माहिती मिळाल्यानंतर वनसेवक बी के खर्गे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here