कोरोना महामारीमुळे सलग दुसऱ्या वर्षी भैरवनाथ देवस्थान जातेगावची यात्रा रद्द

सुपा 

कोरोना महामारीचे थैमान मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने पारनेर तालुक्यातील जातेगाव येथिल श्री भैरवनाथांची दिनांक २७ एप्रिल व २८ एप्रिलला होणारी यात्रा रद्द् करण्यात आली असून भाविकांनी कोरोनाची महामारी आटोक्यात आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला सहकार्य करण्यासाठी जातेगाव देवस्थानला येऊ नये असे आवाहन भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अर्जुन बढे उपाध्यक्ष विजय जऱ्हाड सचिव प्रभू गायकवाड खाजिनदार स्वाती पोटघन कार्याध्यक्ष बन्सी ढोरमले सहसचिव शशिकांत भगत उपसमितीचे अध्यक्ष विशाल फटागंडे यांच्यासह विश्वस्त मंडळ व जातेगाव ग्रामस्थांनी केले आहे

 

याबाबतचे निवेदन भैरवनाथ देवस्थान ट्रस्टने प्रसिद्ध केले आहे यात्रा उत्सवाच्या वेळी देवाला तेल लावणे आभिषेक व आरती फक्त पुजाऱ्या मार्फत केली जाईल यात्रा उत्सवाच्या दरम्यान पवित्र गंगाजल कावड मिरवणूक छबिना मिरवणूक पालखी मिरवणूक मानाच्या काठया मिरवणूक शोभेचे दारू काम व इतर कार्यक्रम रद्द् करण्यात आले आहेत

 

दोन दिवस चालणाऱ्या यात्रेमध्ये अनेक जिल्हातील लाखो भाविक या ठिकाणी येत असतात मेवा – मिठाईची खेळण्यांची शेती उपयोगी साहित्यांची अनेक दुकाने मोठ्या प्रमाणात लावत असतात  या  यात्रा उत्सवाच्या निमित्ताने लाखो रुपयांची उलाढाल दरवर्षी होत असते मात्र  या वर्षी यात्राच रद्द् झाल्याने भाविकांबरोबर गावकऱ्यांचाही हिरमोड झाला आहे
कोरोनाचा जागतिक महामारीचा बिमोड करण्यासाठी राज्याचे मुंख्यंमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिनांक १ मे पर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे

 

 

राज्याचे मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे यांनीही विविध उपाययोजना करून लोक घरातच कसे थांबतील अशी प्रभावी व लोकाभिमुख योजना राबवली आहे देवस्थान यामध्ये पूर्णपणे सहभागी आहे यामुळे यात्रेनिमित्त भाविकांनी देवस्थानला येऊ नये असे आवाहन भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट जातेगाव ने केले आहे

3 COMMENTS

  1. Howdy, i read your blog from time to time and i own a similar one and i was just wondering if you get a lot of spam responses? If so how do you prevent it, any plugin or anything you can suggest? I get so much lately it’s driving me mad so any assistance is very much appreciated.

  2. Have you ever thought about including a little bit more than just your articles? I mean, what you say is valuable and everything. Nevertheless think about if you added some great photos or video clips to give your posts more, “pop”! Your content is excellent but with images and clips, this blog could undeniably be one of the most beneficial in its field. Superb blog!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here