Home crime कोविड मध्ये प्रशासन व्यस्त ,तर वाळू तस्कर म्हणतात मस्त चाललंय आमचं …..

कोविड मध्ये प्रशासन व्यस्त ,तर वाळू तस्कर म्हणतात मस्त चाललंय आमचं …..

सध्या लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे पोलीस,महसूल यंत्रणा व्यस्त आहे याचाच गैरफायदा उचलत वाळूतस्करी सुरू आहे याच अवैध पद्धतीने वाळू उत्खनन करणारे एक जेसीबी मशीन,चोरटी वाळू वाहतूक करणारा एक ट्रॅकटर व त्यातील एक ब्रास वाळू असा एकूण १५लाख५हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल श्रीगोंदा पोलिसांनी पकडला आहे
अज्ञात चालक मालकाविरोधात पो कॉ प्रकाश मांडगे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे काल दि२५रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा शहराजवळील (शिंदेमळा)भोळेवस्ती या ठिकाणी वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन  पाहणी केली
असता  ्या ठिकाणी जेसीबी यंत्राच्या साह्याने मोठ्या प्रमाणात वाळू काढून ट्रॅक्‍टरच्या साह्याने त्याची वाहतूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे याठिकाणी पोलिसांनी कारवाई करत सदर अवैध वाळू उत्खनन,वाळू वाहतूक करणारे मशीन व ट्रॅकटर पोलिसांनी पकडले आहेत चालक मात्र पसार झाला आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here