हनुमान जयंती उत्सव सर्वत्र मोजक्याच भाविकांच्या उपास्थीतीत साजरी ….

अहमदनगर 

चैत्र पौर्णिमे निमित्त ठिकठिकाणी हनुमान जयंती उत्सव मोजक्याच भाविकांच्या उपास्थीतीत मात्र उत्साहात  साजरी करण्यात आली . गेल्या वर्षी प्रमाणेच यंदाही कोरोनाचे सावट असल्याने सर्व हनुमान मांदिरांतून कोरोना नियमांचे पालन करून हनुमान जयंती उत्सव साजरा होत आहे…..

 

 

 

भक्तांना फलप्राप्ती देणारा  झेंडीगेट्च्या दक्षिण मुखी श्री हनुमान मंदिरात पहाटेच श्रीहनुमान जन्मोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आणि सत्वर अनुग्रह करणारे दैवत असल्याने या मंदिरात दरवर्षी हनुमान जन्मोत्सव भक्त गणांच्या उपस्थितीत साजरा होतो.

 

 

 

 

मात्र गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाही कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने मोजक्या भाविकांच्या उपस्थितीतच हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला.पहाटे पाच वाजता पुरोहित ची.वेद निसळ ,श्री.सिद्धेश्वर निसळ, यांनी मंत्रोपचाराने पूजेचा प्रारंभ केला.

 

 

 

राहुल कावट यांच्या हस्ते हरिद्वार येथून आणलेल्या पवित्र गंगाजलाने हनुमंताला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पूजा आरती होऊन देवस्थानचे प्रमुख आणि चार सेवेकरी यांना प्रसाद देण्यात आला. यावेळी भीमरूपी स्तोत्र , हनुमान चालीसा , श्रीराम स्तोत्र आदींचे पठाण करण्यात आले.

 

 

पानसरे गल्ली येथील पंचमुखी हनुमान मंदिरात सेवेकरी शिवनारायण वर्मा आणि महाराज पंडित शर्मा यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात अली. या मंदिरातही मोजक्याच भाविकांच्या उपस्थित हनुमान जयंती साजरी झाली.

2 COMMENTS

  1. I?¦ve been exploring for a little for any high quality articles or blog posts on this kind of house . Exploring in Yahoo I eventually stumbled upon this site. Reading this information So i am glad to express that I’ve a very excellent uncanny feeling I came upon exactly what I needed. I most indisputably will make sure to do not put out of your mind this web site and give it a look on a continuing basis.

  2. Great blog! Is your theme custom made or did you download it from somewhere? A theme like yours with a few simple tweeks would really make my blog jump out. Please let me know where you got your design. Cheers

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here